आज भारतात उपलब्ध होणार वनप्लस X ची सिरेमिक आवृत्ती

Updated on 24-Nov-2015
HIGHLIGHTS

वनप्लस X ने ह्यात दागिन्यात उपलब्ध होणा-या ‘जरकोनिया’ चा वापर केला आहे. त्याच कारणामुळे कंपनीने ह्याचा मर्यादित स्टॉकच बाजारात आणला आहे.

मोबाईल निर्माता कंपनी वनप्लस ने अलीकडेच भारतात आपला नवीन स्मार्टफोन वनप्लस X लाँच केला आहे. कंपनी आपल्या ह्या स्मार्टफोनला वेगवेगळ्या प्रकारात सादर करेल. त्यातील वनप्लस X चे सिरेमिक एडिशन आज भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल.

 

ह्याची किंमत २२,९९९ रुपये आहे आणि हा ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉनवर मिळेल. वनप्लस X च्या इतर स्मार्टफोन्ससारखा हा सिरेमिक प्रकारसुद्धा इनवाइटच्या माध्यमातून मिळेल. वनप्लसने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ह्याविषयी माहिती दिली आहे.  वनप्लस X च्या सिरेमिक एडिशन स्मार्टफोनची डिझाईन खूप खास आहे. वनप्लस X  ने ह्यात दागिन्यात उपलब्ध होणा-या ‘जरकोनिया’ चा वापर केला आहे. त्याच कारणामुळे कंपनीने ह्याचा मर्यादित स्टॉकच बाजारात आणला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, ह्या स्मार्टफोनचे केवळ १०,००० यूनिटच बनवले गेले आहेत.

वनप्लस X च्या सिरेमिक एडिशन स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची AMOLED डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080p आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी गोरिल्ला ग्लास 3 सुद्धा दिली गेली आहे. त्याचबरोबर ह्यात 2.3GHz चे स्नॅपड्रॅगन  क्वाड-कोर प्रोसेसर आणि 3GB रॅम आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने 128GB वाढवता येते.

ह्यात १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा ऑक्सिजन ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित अॅनड्रॉईड 5.1.1 लॉलीपॉपवर चालतो. त्वरित चार्जिंगसह ह्यात २५२५ mAh ची बॅटरी दिली गेली आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात हायब्रिड ड्युल सिम कार्ड स्लॉटचा पर्याय दिला गेला आहे. ज्याने ह्याच्या एक स्लॉटमध्ये मायक्रो-एसडी कार्डसुद्धा लावला जाऊ शकतो. त्याशिवाय ह्यात 4G LTE, वायफाय आणि ब्लूटुथ 4.0 सुद्धा आहे.

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :