OnePlus चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन येतोय, 50MP कॅमेरासह मिळेल 5000mAh ची बॅटरी

OnePlus चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन येतोय, 50MP कॅमेरासह मिळेल 5000mAh ची बॅटरी
HIGHLIGHTS

OnePlus लवकरच स्वस्त स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत.

नवीन फोन Oppo A57 च्या ट्वीक वर्जनच्या रूपात लाँच होण्याची शक्यता.

नवीन स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरासह 5000mAh ची बॅटरी उपलब्ध.

OnePlus आता बजेट सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. OnePlus ने अलीकडेच Nord CE 2 Lite 5G 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच केला आहे. त्यानंतर, आता कंपनी नवीन बजेट हँडसेट लाँच करण्याच्या तयारीत आहे. या आगामी मिस्ट्री फोनला FCC ने देखील प्रमाणित केले आहे. या लिस्टमध्ये OnePlus च्या या आगामी फोनच्या खास फीचर्सबद्दलही माहिती देण्यात आली आहे. फोनच्या फीचर्सवरून असा अंदाज लावला जात आहे की, हा एक स्वस्त स्मार्टफोन असेल आणि कंपनी नॉर्ड सीरीज अंतर्गत नवीन स्मार्टफोन लाँच करेल.

 Oppo फोनचे ट्विक वर्जन असण्याची शक्यता 

FCC लिस्टिंगनुसार, फोनचा मॉडेल नंबर CPH2469 आहे आणि तो 4G LTE डिव्हाइस असेल. त्याबरोबरच, FCC फाइलिंगमध्ये एक दस्तऐवज देखील दिलेले आहे. ज्यानुसार Oppo ने OnePlus ला Oppo चे मॉडेल नंबर CPH2387 असलेले फोन त्याच्या स्वतःच्या नावाने बाजारात आणण्यासाठी अधिकृत केले आहे. CPH2387 हा नुकताच लाँच झालेल्या Oppo A57 4G स्मार्टफोनचा मॉडेल क्रमांक आहे. Oppo चा हा फोन थायलंडमध्ये लाँच करण्यात आला आहे. असे मानले जात आहे की, हा फोन Oppo A57 चे ट्वीक केलेले वर्जन असण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा:  Oppoचा नवीन 5G फोन लवकरच भारतात येणार, 8GB RAM सह मिळेल मजबूत बॅटरी

50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी

या फोनमध्ये OnePlus लोगोसह नवीन बॅटरी कव्हर, रेड USB केबलसह 50-megapixel + 2-megapixel ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात येणार ते. फोनमध्ये मिळणारे बाकीचे फीचर्स Oppo A57 4G सारखे असू शकतात. मॉडेल क्रमांक CPH2469 सह OnePlus फोन 163.74 मिमी उंच, 75.03 मिमी रुंद आणि 7.99 मिमी जाडीला असेल. यामध्ये, कंपनी 5000mAh बॅटरी देणार आहे, जी SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोनबद्दलच्या या माहितीवरून असा अंदाज लावला जात आहे की, हा नॉर्ड सीरीजचा स्मार्टफोन असू शकतो.

Oppo A57चे फीचर्स

Oppo A57 बद्दल बोलायचे झाले तर फोन मध्ये 6.56-इंच लांबीचा LCD HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हे डिवाइस 3 GB रॅम आणि 64 GB पर्यंत इंटर्नल स्टोरेजसह सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी फोनमध्ये MediaTek Helio G35 देत आहे. फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागील बाजूस 13 मेगापिक्सेल + 2 मेगापिक्सेल ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo