वनप्लस X च्या किंमतीत झाली मोठी घट

Updated on 04-Apr-2016
HIGHLIGHTS

तथापि, वनप्लस X चे शॅम्पेन एडिशन १६,९९९ रुपये आणि वनप्लस X लिमिटेड सेरामिक एडिशन २२,९९९ रुपयात मिळत आहे.

मोबाइल निर्माता कंपनी वनप्लसने आपला स्मार्टफोन वनप्लस X च्या किंमतीत खूप मोठी घट केली आहे. वनप्लस X ऑनिक्स एडिशन आता ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अॅमेझॉनवर १४,९९९ रुपयाच्या किंमतीत उपलब्ध झाला आहे. तथापि, वनप्लस X च्या शॅम्पेन एडिशन १६,९९९ रुपये आणि वनप्लस X लिमिटेड सेरामिक एडिशन २२,९९९ रुपयाच्या किंमतीत मिळत आहे.
 

वनप्लस X च्या लाँचवेळी हा १६,९९९ रुपयाच्या किंमतीत आणला होता आणि आधी हा निमंत्रणाच्या माध्यमातून मिळत होता. मात्र फेब्रुवारी २०१५ पासून हा फोन सामान्य सेलद्वारे खरेदीसाठी उपलब्ध आहे.

ह्याच्या वैशिष्ट्याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची पुर्ण HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे. हा डिस्प्ले AMOLED आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात एक हायब्रिड ड्युल सिमसुद्धा आहे. वनप्लस X स्मार्टफोन ऑक्सिजन ओएस २.१ वर चालेल. हा अॅनड्रॉईड 5.1.1 लॉलीपॉपवर आधारित आहे. हा स्मार्टफोन 2.3GHz क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 801 चिपसेटने सुसज्ज आहे. ह्यात १६जीबीचे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने १२८जीबीपर्यंत वाढवू शकतो.

त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये ADAFसह  १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये 4G LTE सपोर्ट दिला आहे. वनप्लस X स्मार्टफोन ऑक्सिजन ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. हा स्मार्टफोन २५२५mAh बॅटरी सुसज्ज आहे. कनेक्टिव्हिटीबाबत बोलायचे झाले तर, ह्यात 4G LTE बँड, वायफाय 802.11 B/G/N, एफएम रेडियो आणि मायक्रो-USB वैशिष्ट्य समाविष्ट आहे.

हेदेखील वाचा – कमी किंमतीतही उत्कृष्ट कॅमेरा रिझोल्युशन देतात हे कॅनन डिजिटल कॅमेरे

हेदेखील वाचा – ओला ने आणली ऑटो कनेक्ट वायफाय सुविधा

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :