आजपासून सेलसाठी उपलब्ध झाला OnePlus X Champagne एडिशन
मंगळवारी मध्यरात्रीपासून भारतात कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन OnePlus X Champagne एडिशन सेलसाठी उपलब्ध झाला आहे. ह्याला अॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून १६,९९९ रुपयात खरेदी करु शकता.
भारतात OnePlus X Champagne एडिशन आता खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून भारतात कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन OnePlus X Champagne एडिशन सेलसाठी उपलब्ध झाला आहे. ह्याला अॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून १६,९९९ रुपयात खरेदी करु शकता. ज्या रेग्यूलर यूजर्सला वनप्लस X च्या Onyx चे निमंत्रण आहे, ते सुद्धा हा फोन खरेदी करु शकतात. Onyx साठीही हिच किंमत ठेवण्यात आली आहे.
वनप्लस X शॅम्पेन एडिशनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची पुर्ण HD AMOLED डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेला आहे. हा स्मार्टफोन 2.3GHz क्वाडकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 801 चिपसेट आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.
ह्यात १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन ऑक्सिजन ओएस 2.1 वर चालतो जो अॅनड्रॉईड 5.1.1 लॉलीपॉपवर आधारित आहे. स्मार्टफोनमध्ये हायब्रिड सिम-स्लॉट आहेत, म्हणजे एक सिम कार्ड स्लॉटचा वापर मायक्रो-एसडी कार्ड स्लॉट म्हणून केला जाऊ सकतो. हा स्मार्टफोन 2525mAh च्या बॅटरीने सुसज्ज आङे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 4G LTE बँड, वायफाय 802.11 B/G/N, FM रेडियो आणि मायक्रो-USB फीचर आहे.
काही दिवसापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार असेही सांगितले जातय की, ज्या यूजरजवळ वनप्लस X स्मार्टफोनचे निमंत्रण असेल, ते त्याचा उपयोग शॅम्पेन एडिशन खरेदी करण्यासाठीही करु शकतात.
Digit NewsDesk
Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile