जुन्या फोन्स साठी वनप्लस ने आपला गॅलरी अॅप केला अपडेट
नवीन अपडेट्स मधील अनेक फीचर्स OnePlus 6 मध्ये आधी पासून आहेत आणि आता ते OnePlus 5, OnePlus 5T, OnePlus 3 आणि OnePlus 3T स्मार्टफोन्स मध्ये पण येतील.
OnePlus update its gallery app for older devices: वनप्लस ने नवीन फीचर्स देण्यासाठी आपल्या गॅलरी अॅप ला अपडेट केले आहे, ज्यात नवीन विडियो एडिटिंग टूल पण आहे जो वापरून यूजर्स विडियो ट्रिम करू शकतात, बॅकग्राउंड ला साउंडट्रॅक टाकू शकतात किंवा फिल्टर्स टाकू शकतात. अपडेट मध्ये स्लो-मोशन विडियो एडिटिंग टूल आणि इतर बग फिक्स पण आहेत. यातील अनेक फीचर्स OnePlus 6 मध्ये आधीपासून आहेत पण हा अपडेट हे फीचर्स कंपनी च्या जुन्या फोन्स साठी येत आहे ज्यात OnePlus 5 , OnePlus 5T, OnePlus 3 आणि OnePlus 3T स्मार्टफोन्स यांचा समावेश आहे.
हा लेटेस्ट अपडेट काही जुन्या OnePlus फोन्स मध्ये विडियो एडिटिंग फीचर पण घेऊन येतो. काही जुन्या OnePlus फोन्स साठी ओपन बीटा प्रोग्राम मध्ये हा फीचर असू शकतो. अपडेट ग्लोबली जारी केला जात आहे, त्यामुळे आता सर्व यूजर्स या फीचर्स चा वापर करू शकतील. जर तुम्ही तुमच्या फोन मधील अॅप अपडेट केला असेल तर आता तुम्ही OnePlus च्या गॅलरी अॅप मधून विडियो ट्रिम किंवा एडिट करू शकता. तर काही गॅलरी अॅप्स यूजर्सना इमेज विडियो एडिटींग सारखे फंक्शंस ऑफर करतात.
या अपडेट नंतर यूजर्स डिवाइस मध्ये स्लो-मोशन विडियो एडिट करू शकतात, ज्यामुळे तुम्ही विडियो आपल्या गरजेनुसार सेट करू शकता की कुठून विडियो स्लो-मोशन मध्ये असेल आणि कुठून रेगुलर स्पीड वर येईल. विडियो एडिटर तेव्हा दिसेल जेव्हा तुम्ही नार्मल विडियो वरील एडिट बटन वर टॅप कराल. जुन्या OnePlus डिवाइस 120fps स्लो-मोशन विडियो रेकॉर्ड करू शकतात, तर OnePlus 6 ने फ्रेम-रेट 240fps आणि 480fps विडियो पर्यंत वाढवला आहे.
या आधी OnePlus यूजर्सना विडियो एडिट करण्यासाठी थर्ड-पार्टी अॅप्स ची मदत घ्यावी लागत होती आणि गॅलरी अॅप मधून फक्त विडियो बघता येत होते. विडियो ट्रिम करणे किंवा बॅक ग्राउंड मध्ये साउंडट्रॅक टाकणे अशा यूजर्स साठी उपयोगी ठरू शकते जे खुप विडियो शूट करतात आणि सोशल मीडिया वर अपलोड करतात.