OnePlus Summer Launch Event: प्रसिद्ध कंपनीच्या मोठ्या इव्हेंटची घोषणा, लाँच होतील अनेक अप्रतिम प्रोडक्ट्स 

OnePlus Summer Launch Event: प्रसिद्ध कंपनीच्या मोठ्या इव्हेंटची घोषणा, लाँच होतील अनेक अप्रतिम प्रोडक्ट्स 
HIGHLIGHTS

OnePlus ने अधिकृत साईटद्वारे OnePlus Summer Launch Event ची घोषणा केली.

इव्हेंटदरम्यान OnePlus Nord 4 5G सह इतर नवे प्रोडक्ट्स लाँच केले जातील.

OnePlus Summer Launch Event 16 जुलै रोजी होणार आहे.

OnePlus Summer Launch Event: प्रसिद्ध फ्लॅगशिप किलर स्मार्टफोन निर्माता OnePlus ने त्यांच्या समर लाँच इव्हेंटची घोषणा केली आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी आपले नवीन डिवाइस सादर करणार आहे. इव्हेंटदरम्यान, OnePlus Nord 4 5G, OnePlus Buds 3 Pro आणि OnePlus Watch 2R इ. नवे प्रोडक्ट्स सादर केले जातील, अशी अपेक्षा आहे. सध्या कंपनीने प्रोडक्टशी संबंधित तपशील उघड केलेला नाही. मात्र, कंपनीने नवीन टीझर पोस्टरद्वारे ‘NORD’ ला टीज केले आहे.

Also Read: लेटेस्ट Vivo T3 Lite 5G ची आज भारतात पहिली Sale, जाणून घ्या किंमत आणि अप्रतिम ऑफर्स

OnePlus Summer Launch Event ची घोषणा

फ्लॅगशिप किलर OnePlus ने समर लाँच इव्हेंटची तारीख जाहीर केली आहे. वनप्लसचा हा इव्हेंट 16 जुलै रोजी होणार आहे, जो इटलीतील मिलान येथे आयोजित केला जाईल. होय, कंपनीने अधिकृत साईटद्वारे OnePlus Summer Launch Event ची घोषणा केली आहे. मात्र, वर सांगितल्याप्रमाणे, सध्या कंपनीने या इव्हेंटदरम्यान कोणते डिव्हाइस लाँच होणार या संबंधित तपशील उघड केले नाहीत. मात्र, यासोबतच कंपनीने आणखी एक टीझर व्हिडिओ शेअर केला आहे.

वरील पोस्टमधील टीझर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, सिल्व्हर कलरमध्ये ‘Nord’ लिहिलेले दिसत आहे. याद्वारे, कंपनी या इव्हेंटमध्ये OnePlus Nord 4 स्मार्टफोन सादर करेल, अशी अपेक्षा आहे. OnePlus Nord 4 फोन मागील वर्षी लाँच केलेल्या OnePlus Nord 3 चा सक्सेसर असेल.

OnePlus Nord 4 बद्दल लीक्स

OnePlus Nord 4 लवकरच भारतात होणार लाँच

लीक रिपोर्टनुसार, आगामी OnePlus Nord 4 फोन 6.74 इंच लांबीच्या AMOLED कर्व डिस्प्लेसह येऊ शकतो, जो 120Hz रिफ्रेश रेटसह असेल. उत्तम परफॉर्मन्ससाठी हा फोन Snapdragon 7+ Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज असेल. त्याबरोबरच, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच, यात 50MP सेकंडरी कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर प्रदान केला जाऊ शकतो. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5500mAh बॅटरी आहे, जी 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीच्या समर्थनासह येण्याची शक्यता आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo