मागील काही काळापासून चर्चेत असेलला OnePlus Pad Go आज 6 ऑक्टोबर रोजी भारतात लाँच होणार आहे. लॉन्च करण्यापूर्वी कंपनीने या टॅबलेटशी संबंधित अनेक तपशील अधिकृत केले आहेत. मात्र, अधिकृत लाँचपूर्वी OnePlus Pad Go ची किंमत ऑनलाइन लीक झाली आहे. एका प्रसिद्ध टिपस्टरने Amazon वरून एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये टॅबची सुरुवातीची किंमत आणि बँक ऑफर्सची माहिती लाँचपूर्वीच देण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा: नव्या आणि आकर्षक रंग-रूपात लाँच झाला OnePlus 11R, मिळेल 4000 रुपयांचा Discount
प्रसिद्ध टिपस्टर इशान अग्रवालने त्याच्या X हँडलवर Amazon लिस्टिंगचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. Amazon लिस्टिंगमध्ये पाहिल्याप्रमाणे, OnePlus Pad Go ची सुरुवातीची किंमत भारतात 17,999 रुपयांपासून सुरू होईल.
आम्ही तुम्हाला सांगतो की, केवळ किंमतच नाही तर या टॅबसोबत उपलब्ध ऑफर आणि प्री-बुकिंगचा तपशीलही पोस्टरमध्ये समोर आला आहे. भारतात 12 ऑक्टोबरपासून टॅबचे प्री-बुकिंग सुरू होणार आहे. प्री-बुकिंग ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, OnePlus Tab प्री-बुक करणार्या वापरकर्त्यांना कंपनी 1,399 रुपयांचे मोफत टॅब कव्हर गिफ्ट म्हणून देईल. त्यानंतर, टॅबची विक्री 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे.
OnePlus Pad Go चे अनेक फीचर्स लॉन्च होण्यापूर्वी कन्फर्म करण्यात आले आहेत. OnePlus च्या या टॅबमध्ये 11.35 इंच लांबीचा डिस्प्ले मिळणार आहे. हा टॅब MediaTek Helio G99 प्रोसेसरने सुसज्ज असेल, ज्यामध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असेल. MediaTek चा Helio G99 हा एक अविश्वसनीय प्रोसेसर आहे, जो विशेषतः गेमरसाठी सुधारित कॅमेरा, वेगवान डिस्प्ले आणि भरोसेमंद कनेक्टिव्हिटीसह दिवसभर स्मूथ परफॉर्मन्सचा अनुभव घेण्यासाठी डिझाइन केलेला आहे.
एवढेच नाही तर, उत्कृष्ट आवाजाच्या कॉलिटीसाठी या टॅबमध्ये डॉल्बी ATMOS क्वाड स्पीकर्स देण्यात आले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, टॅब्लेटमध्ये बॅटरी 8000mAh असेल, जी 33W फास्ट चार्जिंगच्या समर्थनासह येईल.