OnePlus Open ची पहिली सेल भारतात सुरू, पहिल्याच दिवशी मिळतोय तब्बल 11 हजार रुपयांपर्यंत Discount। Tech News

Updated on 27-Oct-2023
HIGHLIGHTS

OnePlus च्या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोन Oneplus Open ची सेल

यात AMOLED डिस्प्ले, क्वालकॉमचा प्रीमियम प्रोसेसर आणि हेवी स्टोरेज आहे.

पहिल्याच दिवशी मिळतोय तब्बल 11 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट

OnePlus च्या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोन Oneplus Open ची पहिली सेल आजपासून भारतात सुरु झाली आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध करून दिला गेला आहे. यात AMOLED डिस्प्ले, क्वालकॉमचा प्रीमियम प्रोसेसर आणि हेवी स्टोरेज आहे. पहिल्या सेलमध्ये कंपनी या फोनवर थेट मोठी सूट देत आहे. चला तर मग फोनवरील पहिल्या सेलमधील ऑफर्स सविस्तर बघुयात.

OnePlus Open ची किंमत आणि लॉन्च ऑफर

OnePlus Open च्या 16GB RAM आणि 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,39,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन Emerald Dusk आणि Voyager Black या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास ICICI बँक कार्ड आणि वनकार्ड व्यवहारांद्वारे हे उपकरण खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 5000 रुपयांची त्वरित सूट मिळेल.

एवढेच नाही, तर पहिल्या सेलमध्ये कंपनी काही स्मार्टफोनच्या एक्सचेंजवर 6000 रुपयांपर्यंतचा ट्रेड-इन बोनस देखील देत आहे.

OnePlus Open चा तपशील

OnePlus Open ला 7.82-इंच लांबीची फ्लेक्सी-फ्लुइड AMOLED स्क्रीन मिळते, जी 1-120Hz पर्यंत डायनॅमिक रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. त्याबरोबरच, हा स्मार्टफोन 6.31-इंच लांबीच्या सुपर फ्लुइड AMOLED कव्हर डिस्प्लेसह येतो आणि ही स्क्रीन 10-120Hz पर्यंत डायनॅमिक रिफ्रेश रेट देते.

प्रोसेसरबद्दल बोलायचे झाल्यास, OnePlus चा हा नवीनतम फोल्डेबल फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. त्याबरोबरच, हा फोन 4,805mAh ड्युअल-सेल बॅटरीवर चालतो, जो OnePlus च्या 67W SuperVOOC चार्जरद्वारे जलद चार्ज केला जाऊ शकतो.

कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर, या फोनमध्ये 48MP मुख्य कॅमेरा आहे जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन म्हणजेच OIS, HDR आणि EIS ला सपोर्ट करतो. याशिवाय, हे फोल्डेबल 48MP अल्ट्रावाइड सेन्सर आणि 64MP टेलिफोटो लेन्ससह येते.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :