Its Here! दोन सेल्फी कॅमेरासह कंपनीचा पहिला फोल्डेबल फोन OnePlus Open भारतात लाँच, जाणून घ्या किंमत
अखेर कंपनीने आपला पहिला स्मार्टफोन OnePlus Open भारतात लाँच केला आहे.
फोनसाठी प्री-ऑर्डर आज 19 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
ICICI बँक कार्डद्वारे फोनवर 5000 रुपयांची झटपट सूट ऑफर उपलब्ध असेल.
मागील काही दिवसांपासून प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता OnePlus च्या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या लाँचची चर्चा सर्वत्र सुरु होती. आता अखेर कंपनीने आपला पहिला स्मार्टफोन OnePlus Open भारतात लाँच केला आहे. OnePlus चाहते या स्मार्टफोनची आतुरतेने वाट बघत होते, त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. हा फोन भारतीय बाजारपेठेत Samsung Galaxy Z Fold5 सारख्या स्मार्टफोनशी स्पर्धा करेल, असे देखील म्हटले जात आहे.
हे सुद्धा वाचा: Redmi चा बजेट स्मार्टफोन आणखी स्वस्तात खरेदी करा, मिळतायेत Best Discount ऑफर्स। Tech News
OnePlus Open ची किंमत
कंपनीने OnePlus Open स्मार्टफोन तब्बल 1,39,999 रुपयांमध्ये लाँच केला आहे. ही किंमत फोनच्या 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे. त्याबरोबरच, उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, फोनसाठी प्री-ऑर्डर आज 19 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तर, फोनची सेल 27 ऑक्टोबरपासून सुरू होईल. ICICI बँक कार्डद्वारे फोनवर 5000 रुपयांची झटपट सूट ऑफर उपलब्ध असेल.
तुम्ही ते Amazon आणि OnePlus India साइटवरून खरेदी करू शकाल. व्हॉयजर ब्लॅक आणि एमराल्ड डस्क कलर पर्याय फोनमध्ये उपलब्ध आहेत.
OnePlus Open
OnePlus च्या या फोनमध्ये 7.82 लांबीचा इंच प्राइमरी AMOLED डिस्प्ले आहे आणि 6.31 इंच लांबीचा कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही डिस्प्लेमध्ये 2K रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. स्पीड आणि मल्टी- टास्किंगसाठी फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसरसह सुसज्ज आहे, ज्यामध्ये 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज उपलब्ध आहे. फोनची बॅटरी 4805mAh आहे, ज्यामध्ये 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात OIS सपोर्टसह 48MP Sony LYT-T808 प्राइमरी कॅमेरा आहे. तसेच, फोनमध्ये 48MP सेकंडरी कॅमेरा आणि 64MP टेलिफोटो कॅमेरा समाविष्ट आहे, ज्यामध्ये 3X ऑप्टिकल झूम देखील मिळेल. यामध्ये देखील OIS सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP आणि 20MP असे दोन कॅमेरे मिळणार आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile