Revealing! OnePlus Open ची लाँच डेट कन्फर्म, Samsung-Motorola च्या फोल्डेबल्सना मिळेल जबरदस्त स्पर्धा। Tech News
OnePlus चा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन OnePlus Open लवकरच लाँच होणार
हा OnePlus मोबाईल पुढील आठवड्यात मुंबईत लाँच करण्यात येणार आहे.
फोन बाजारातील Samsung-Motorola च्या लोकप्रिय फोल्डेबल्सना जबरदस्त स्पर्धा देईल.
लोकप्रिय हँडसेट निर्माता OnePlus चा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन OnePlus Open लवकरच ग्राहकांसाठी बाजारात दाखल होणार आहे. गेल्या काही काळापासून या आगामी स्मार्टफोनबाबत आतापर्यंत अनेक अहवाल समोर आले आहेत. त्यानंतर कंपनीने OnePlus Open च्या लाँच डेटची पुष्टी देखील केली आहे.
OnePlus Open लाँच डेट
आम्ही तुम्हाला सांगतो की, हा OnePlus मोबाईल पुढील आठवड्यात मुंबईत लाँच करण्यात येणार आहे. कंपनीने त्यांच्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर हँडलवर शेअर करताना OnePlus Open ची लाँच डेट जाहीर केली आहे. त्याबरोबरच, फोनची एक इमेज सुद्धा कंपनीने शेअर केली आहे.
OnePlus ने सांगितले की हा आगामी OnePlus स्मार्टफोन पुढील आठवड्यात 19 ऑक्टोबर रोजी मुंबईत संध्याकाळी 7:30 वाजता लॉन्च होईल. असे मानले जात आहे की, हा फोन बाजारातील Samsung-Motorola च्या लोकप्रिय फोल्डेबल्सना जबरदस्त स्पर्धा देणार आहे.
OnePlus Open चे अपेक्षित स्पेसिफिकेशन्स
लीकनुसार, फोनचा अंतर्गत डिस्प्ले 7.82 इंच OLED स्क्रीन असेल, जो 120 Hz रिफ्रेश रेटसह येऊ शकतो. तर फोनचा आऊटर डिस्प्लेमध्ये 6.31 इंच लांबीची OLED स्क्रीन दिली जाईल, जी 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह मिळेल. वनप्लस फोल्डेबल फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 2 चिपसेटसह 12GB रॅम असेल.
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, लीकनुसार फोनमध्ये तीन कॅमेरे दिले जातील. ज्यामध्ये 48MP प्राइमरी वाइड-एंगल लेन्स, 48MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 64MP टेलिफोटो कॅमेरा सेन्सर असेल. या फोनमध्ये 4805mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 100 वॉट वायर्ड फास्ट चार्जला सपोर्ट करते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile