Amazing! OnePlus चा पहिला फोल्डेबल फोन आज भारतात होणार Launch, किती असेल किंमत? Tech News 

Amazing! OnePlus चा पहिला फोल्डेबल फोन आज भारतात होणार Launch, किती असेल किंमत? Tech News 
HIGHLIGHTS

आज कंपनी आपला पहिला फोल्डेबल फोन OnePlus Open भारतात लाँच करणार

कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून सुरु होणार

नव्या फोल्डेबल फोनची किंमत 1 लाखांपेक्षा जास्त असण्याची शक्यता

स्मार्टफोन निर्माता OnePlus आज आपला पहिला वहिला फोल्डेबल स्मार्टफोन मार्केटमध्ये लाँच करणार आहे. आज कंपनी आपला पहिला फोल्डेबल फोन OnePlus Open भारतात लाँच करणार आहे. मागील काही काळापासून या फोनबाबत टेक विश्वात अनेक चर्चा सुरु होत्या. चला तर मग जाणून घेऊयात लेटेस्ट स्मार्टफोनचा लाँच इव्हेंट कधी, कुठे आणि कसा बघता येईल.

हे सुद्धा वाचा: WhatsApp चॅट्स होणार मजेशीर! आता Avtar द्वारे करता येईल स्टेटस रिप्लाय, ईमोजीसोबत मिळेल New ऑप्शन। Tech News

OnePlus Open लाँच इव्हेंट

या फोनचा लाँच इव्हेंट कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून सुरु होणार आहे. कंपनी आपल्या सोशल मीडिया चॅनेलवर लाइव्ह अपडेट्स देखील देणार आहे. नव्या फोल्डेबल फोनची किंमत 1 लाखांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

OnePlus Open चे अपेक्षित फीचर्स

फोनबाबत अनेक दिवसांपासून लीक येत आहेत. लीकनुसार, त्याचा मेन डिस्प्ले 7.8 इंच लांबीचा असेल. ज्यासह, 120Hz चा रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो. तसेच, आऊटर डिस्प्ले 120 Hz च्या रीफ्रेश रेटसह 6.31 इंच लांबीचा असेल. एक्सटर्नल डिस्प्लेवर तुम्ही स्मार्टफोनवरील सर्व कामे सहज करू शकता.यामध्ये कंपनीचा आयकॉनिक अलर्ट स्लाइडर देखील असेल, ज्याच्या अनेक इमेज ऑनलाईन लीक झाल्या आहेत. फोल्डेबल फोनसाठी अलर्ट स्लाइडर कस्टमाइझ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

OnePlus Open full specs leaked
OnePlus Open full specs leaked

त्याचप्रमाणे, मल्टीटास्किंगसाठी OnePlus Open मध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. त्याबरोबरच, लीकनुसार OnePlus Open मध्ये ड्युअल-डिस्प्ले सेटअप असेल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास OnePlus Open मध्ये 4800 mAh बॅटरी दिली जाऊ शकते, जी 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo