OnePlus Open ची इंडिया लाँच अखेर कन्फर्म, पोस्टरमध्ये बघा Attractive डिझाईनची पहिली झलक। Tech News

Updated on 10-Oct-2023
HIGHLIGHTS

OnePlus Open स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे.

पोस्टरमध्ये कंपनीच्या पहिल्या फोल्डेबल फोनची पहिली झलक बघायला मिळतेय.

फोनची किंमत आणि फीचर्स ऑनलाईन लीक झाले आहेत.

बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला OnePlus Open स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, लोकप्रिय ब्रँड OnePlus चा हा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन असेल. काही काळापूर्वी कंपनीने पुष्टी केली होती की, ती लवकरच भारतात आपला पहिला फोल्डेबल फोन लाँच करणार आहे. आता अखेर कंपनीने या स्मार्टफोन लाँच टीज करण्यास सुरुवात केली आहे. ऑनलाइन लीकमध्ये या फोनशी संबंधित अनेक तपशील समोर आले आहेत. केवळ फीचर्सच नाही तर फोनची किंमतही ऑनलाइन उघड झाली आहे. असे म्हटले जात आहे की कंपनी हा फोन 1,20,000 रुपयांच्या किंमतीत लाँच करू शकते. बघा सविस्तर-

OnePlus Open भारतीय लाँच

OnePlus India ने अखेर वनप्लस ओपन फोनला त्याच्या X म्हणजेच ट्विटर हँडलवर टीज करण्यास सुरुवात केली आहे. OnePlus Open चे पोस्टर पोस्टमध्ये शेअर करण्यात आले आहे. “A true OnePlus experience awaits. Opening Soon।” असे कॅप्शन कंपनीने पोस्टला दिले आहे. या पोस्टरमध्ये फोनची पहिली झलक दिसली आहे, ज्यामध्ये OnePlus Open चा ब्लॅक कलर ऑप्शन बघायला मिळतो.

त्याबरोबरच, हा फोन सेमी फोल्डेबल पद्धतीने ऑफर केला जाऊ शकतो. फोनच्या डाव्या बाजूला एक अलर्ट स्लाइडर देखील दिसत आहे, तर उजव्या बाजूला व्हॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटण देखील दिसत आहेत.

OnePlus Open चे लीक तपशील

OnePlus Open full specs leaked

वर सांगितल्याप्रमाणे, या बहुचर्चित फोनचे बरेच फीचर्स आणि स्पेसीफिकेशन्स लीक झाले आहेत. फोनमध्ये 7.82 इंच लांबीचा OLED डिस्प्ले असेल. तर, फोनचा आऊटर डिस्प्ले 6.31 इंच लांबीचा असेल. दोन्ही डिस्प्लेमध्ये तुम्हाला 120Hz रिफ्रेश रेट दिला जाईल. त्याबरोबरच, फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर मिळू शकतो.

फोटोग्राफीसाठी, या OnePlus फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. या सेटअपमध्ये 3X ऑप्टिकल झूमसह 48MP प्रायमरी, 48MP सेकंडरी आणि 64MP टेलिफोटो लेन्सचा समावेश असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोनची बॅटरी 4,805mAh मिळेल, जी 100W फास्ट चार्जिंग समर्थनासह येईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :