फ्लॅगशिप किलर म्हणून प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता OnePlus ने गेल्या वर्षी आपला फोल्डेबल स्मार्टफोन OnePlus Open सादर केला होता. दरम्यान, आता कंपनीने आपल्या फोल्डेबल स्मार्टफोन OnePlus Open चे Apex Edition लाँच केले आहे. या स्मार्टफोनला नवीन लाल रंग आणि मागील बाजूस लेदर फिनिशसह आणण्यात आले आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात OnePlus Open Apex Edition ची किंमत आणि विशेषता-
Also Read: Motorola Edge 50 First Sale: पहिल्या सेलदरम्यान लेटेस्ट स्मार्टफोनवर मिळतील बंपर ऑफर्स, पहा किंमत
नव्या OnePlus Open Apex Edition स्मार्टफोनची किंमत 1,49,999 रुपये आहे. हे स्मार्टफोन 16GB रॅम आणि 1TB स्टोरेजसह आणले गेले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्मार्टफोन नवीन आकर्षक ‘Crimson Red’ कलरमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर, OnePlus Open ची सुरुवातीची किंमत 1,39,999 रुपये आहे. हा फोन Emerald Dusk आणि Voyager Black कलरमध्ये खरेदी करता येईल.
OnePlus Open Apex Edition मध्ये 6.31 इंच लांबीच्या 2K LTPO 3.0 Super Fluid AMOLED कव्हर स्क्रीन देण्यात आली आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर उपलब्ध आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 16 GB LPDDR5X रॅम आणि 1TB UFS 4.0 स्टोरेज उपलब्ध आहे.
फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये Hasselblad ट्यून्ड ट्रिपल रिअर कॅमेरा युनिट आहे. यात 48MP चा Sony LYT-T808 CMOS प्रायमरी कॅमेरा, 64MP OmniVision OV64B कॅमेरा आणि 48MP Sony IMX58 अल्ट्रा वाइड-एंगल कॅमेरा आहे. त्याबरोबरच, या स्मार्टफोनमध्ये पुढील बाजूस 20MP चा प्राथमिक सेल्फी कॅमेरा आणि 32MP चा सेकंडरी कॅमेरा आहे. पॉवरसाठी, या स्मार्टफोनची 4,805 mAh बॅटरी 67 SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करेल. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.