OnePlus स्मार्टफोन्समध्ये येतेय ग्रीन लाइनची समस्या, कंपनी लाइफटाइम फ्रीमध्ये स्क्रीन बदलणार?

OnePlus स्मार्टफोन्समध्ये येतेय ग्रीन लाइनची समस्या, कंपनी लाइफटाइम फ्रीमध्ये स्क्रीन बदलणार?
HIGHLIGHTS

OnePlus स्मार्टफोनच्या डिस्प्ले पॅनलवर हिरव्या रेषा येण्याच्या तक्रारी वापरकर्त्यांनी नोंदवल्या आहेत.

त्यानंतर कंपनीने वापरकर्त्यांसाठी कायमची विनामूल्य वॉरंटी जाहीर केली आहे.

OnePlus हा आजीवन म्हणजेच लाईफटाईम वॉरंटी देणारा पहिला ब्रँड बनला आहे.

लोकप्रिय चीनी स्मार्टफोन निर्माता OnePlus स्मार्टफोनच्या डिस्प्ले पॅनलवर हिरव्या रेषा येण्याच्या तक्रारी वापरकर्त्यांनी नोंदवल्या आहेत. त्यानंतर कंपनीने  वापरकर्त्यांसाठी कायमची विनामूल्य वॉरंटी जाहीर केली आहे. ग्रीन लाइन समस्या गेल्या काही महिन्यांपासून वाढत जात आहे आणि त्याचे निराकरण करण्यासाठी, OnePlus हा आजीवन म्हणजेच लाईफटाईम वॉरंटी देणारा पहिला ब्रँड बनला आहे. याअंतर्गत कंपनी दोषपूर्ण स्क्रीन मोफत बदलणार आहे.

Green आणि Pink लाईनची समस्या

नवीनतम अहवालांनुसार, सॉफ्टवेअर अपडेटनंतर, कोणत्याही फिजिकल नुकसानाशिवाय हिरव्या आणि गुलाबी रेषा आपोआप स्क्रीनवर दिसतात. इतरही ब्रँडच्या स्मार्टफोन्समध्ये अशा समस्या येतात.

स्क्रीन रीप्लेसमेंट

या घोषणेसह, OnePlus मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट आणि एक व्हाउचर प्रदान करेल. ज्यांचे डिव्हाइस खूप जुने आहेत त्यांच्या इफेक्टिव स्मार्टफोन्सची देवाणघेवाण  करता येईल आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून सवलतीत नवीन डिव्हाइस खरेदी करता येईल.

OnePlus 8 आणि OnePlus 9 सिरीज फोन खरेदी करणारे वापरकर्ते या डीलसाठी पात्र आहेत. ज्यांच्याकडे OnePlus 10R चा नवीन स्मार्टफोन आहे त्यांना 4500 रुपयांचे इन्सेटीव मिळेल, ज्याची सध्या किंमत 34,999 रुपये आहे. OnePlus 8T खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 20,000 रुपयांचे व्हाउचर मिळेल.

समस्यांवर काय म्हणाली कंपनी? 

 "आम्ही समजतो की या समस्येमुळे प्रभावित झालेल्या वापरकर्त्यांची खूप गैरसोय होत आहे आणि आम्ही यासाठी मनापासून दिलगीरी व्यक्त करतो. आम्ही वापरकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी डिव्हाइसचे मूल्यांकन करावे, तुमच्या जवळच्या OnePlus सर्व्हिस सेंटरला भेट द्या. आम्‍ही तुम्‍हाला सर्व प्रभावित डिव्‍हाइसेससाठी पूर्ण स्‍क्रीन बदलण्‍याची सुविधा देऊ. आम्‍ही OnePlus 8 आणि 9  सिरीज मॉडेलसाठी व्‍हाउचर देखील वाढवत आहोत, ज्यामुळे वापरकर्त्‍यांना नवीन OnePlus खरेदी करण्‍याची अनुमती मिळेल हे डिव्‍हाइसवर अपग्रेड करण्‍यास प्रोत्‍साहन देईल. सध्‍याची परिस्थिती पाहता , आम्ही सर्व प्रभावित उपकरणांसाठी आजीवन स्क्रीन वॉरंटी देत आहोत. आम्ही तुमच्या संयमाची आणि समर्थनाची प्रशंसा करतो.", असे कंपनीने म्हटले आहे. 

अँड्रॉइड अथॉरिटीच्या अलीकडील अहवालाने सूचित केले आहे की, नवीन सादर केलेली वॉरंटी योजना या समस्येमुळे प्रभावित झालेल्या भारतीय वापरकर्त्यांना मदत मिळावी म्हणून आणण्यात आली आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo