OnePlus Nord 3 5G Launched: लोकप्रिय नॉर्ड सीरिजचे दोन स्मार्टफोन आणि इयरबड्स लाँच, बघा डिटेल्स

OnePlus Nord 3 5G Launched: लोकप्रिय नॉर्ड सीरिजचे दोन स्मार्टफोन आणि इयरबड्स लाँच, बघा डिटेल्स
HIGHLIGHTS

बहुप्रतिक्षित OnePlus Nord 3 आणि OnePlus Nord CE 3 5G सोबत Nord Buds 2r ट्रू वायरलेस इयरबड्स देखील भारतात लाँच

OnePlus Nord CE 3 5G च्या 8GB RAM + 128GB बेस व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये

OnePlus ने अखेर भारतात Nord सीरीजचे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. बहुप्रतिक्षित OnePlus Nord 3 आणि OnePlus Nord CE 3 5G सोबत Nord Buds 2r ट्रू वायरलेस इयरबड्स देखील भारतात लाँच केले आहेत. या OnePlus स्मार्टफोन्सचे फीचर्स आधीच Amazon वर लिस्ट करण्यात आले होते. बघुयात किमंत, फीचर्स आणि स्पेसीफिकेशन्स. 

OnePlus Nord 3 5G ची किमंत आणि तपशील 

OnePlus Nord 3 5G च्या 8GB RAM + 128GB बेस व्हेरिएंटची किंमत 33,999 रुपये आहे. तर, 16GB RAM + 256GB टॉप व्हेरिएंटची किंमत 37,999 रुपये आहे. या फोनची विक्री 15 जुलै रोजी सुरु होणार आहे. विशेष म्हणजे, निवडक बँक कार्ड्सवरून व्यवहार केल्यास 1,000 रुपयांची सूट मिळेल.

OnePlus च्या या फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. फोनच्या डिस्प्लेचे रिझोल्यूशन FHD + आणि 120Hz अ‍ॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 9000 5G प्रोसेसरवर काम करतो. फोनमध्ये RAM-Vita फीचर उपलब्ध आहे, ज्याद्वारे फोनची रॅम 16GB पर्यंत वर्चुअली वाढवता येते.

फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आहे, जो OIS फीचरला सपोर्ट करतो. तर, 8MP अल्ट्रा वाइड आणि 2MP मॅक्रो सेन्सर उपलब्ध आहे . सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP कॅमेरा आहे. तसेच, यात 5000mAh बॅटरी आहे, जी 80W USB Type C SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

OnePlus Nord CE 3 5G ची किंमत आणि तपशील 

OnePlus Nord CE 3 5G च्या 8GB RAM + 128GB बेस व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. तर, 12GB RAM + 256GB या टॉप व्हेरिएंटची किंमत 28,999 रुपये आहे.

स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच लांबीचा FHD + AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 782G प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याबरोबरच, हा फोन 5000mAh बॅटरी आणि 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. फोन Android 13 वर आधारित OxygenOS वर काम करेल.

कॅमेरा स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, Nord CE 3 5G च्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यात देखील 50MP चा मुख्य कॅमेरा मिळेल, जो EIS आणि OIS ला सपोर्ट करतो. तर, 8MP अल्ट्रा वाईड आणि 2MP मॅक्रो कॅमेरा देखील मिळेल. या फोनमध्ये सुद्धा 16MPचा फ्रंट कॅमेरा आहे.

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo