OnePlus ने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये Nord N20 5G लाँच केला होता. त्यानंतर Nord N20 5Gचा सक्सेसर म्हणून कंपनीने OnePlus Nord N30 5G सादर केला. हा स्मार्टफोन एप्रिलमध्ये लाँच झालेल्या Nord CE 3 Lite चे रीब्रँडेड वर्जन आहे, असे म्हटले जाते. चला तर मग बघुयात नवीन 5G फोनची किंमत आणि सविस्तर माहिती.
https://twitter.com/OnePlus_USA/status/1665720493591130122?ref_src=twsrc%5Etfw
OnePlus 5G स्मार्टफोनची किंमत $299.99 म्हणजेच अंदाजे 24,780 रुपये आहे. कंपनीच्या अधिकृत यूएस वेबसाइटवर फोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. फोन प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना अंदाजे 4,875 रुपये किमतीचे OnePlus Nord Buds 2 TWS इयरफोन मोफत मिळणार आहेत.
OnePlus Nord N30 5G मध्ये 6.72-इंच लांबीचा फुल HD+ 120Hz LCD डिस्प्ले आहे. OnePlus Nord N30 5G स्नॅपड्रॅगन 695 SoC द्वारे 8GB LPDDR4X RAM आणि 128GB UFS 2.2 ऑनबोर्ड स्टोरेजसह सुसज्ज आहे. मायक्रो SD कार्डद्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येणार आहे. हा फोन Android 13-आधारित OxygenOS 13.1 वर चालतो.
या फोनमध्ये तुम्हाला 3x लॉसलेस झूमसह 108MP प्रायमरी कॅमेरा, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ युनिट्स उपलब्ध आहेत. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 16MP फ्रंट कॅमेरा मिळतोय. यामध्ये 5,000 mAh बॅटरी आहे, जी 67W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.