OnePlus चा आगामी स्मार्टफोन OnePlus Nord CE4 लवकरच भारतीय बाजारात लाँच होणार आहे. आगामी स्मार्टफोनचे अनेक फीचर्स लाँच होण्यापूर्वीच समोर आले आहेत. या फोनबद्दल सोशल मीडियावर अनेक लीक येत आहेत. ताज्या रिपोर्टमध्ये स्मार्टफोनची किंमतही लीक झाली आहे. हा कंपनीचा मध्यम श्रेणीचा स्मार्टफोन असेल. OnePlus Nord CE4 स्मार्टफोन भारतात 1 एप्रिल रोजी संध्याकाळी 6:30 वाजता लाँच होईल. चला तर मग जाणून घेऊयात फोनची लीक किंमत.
हे सुद्धा वाचा: आगामी TECNO POVA 6 Pro स्मार्टफोनची भारतीय लाँच डेट कन्फर्म! Powerful फीचर्ससह मिळेल 108MP कॅमेरा। Tech News
लोकप्रिय टिपस्टर योगेश बरार यांच्या मते, OnePlus Nord CE4 ची भारतात किंमत 26,999 रुपये किंवा 27,999 रुपयांपासून सुरू होऊ शकते. लाँच होण्यापूर्वीच फोन 8GB रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह येईल याची पुष्टी झाली आहे. फोनमध्ये स्काय ब्लू आणि डार्क ग्रे मध्ये दोन कलर ऑप्शन्स मिळतील.
Amazon च्या पेजनुसार, डिस्प्लेवर सेल्फी कॅमेरासाठी पंच होल आहे. Qualcomm Snapdragon 7 Gen 3 चिपसेट स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असेल. फोन 100W SUPERVOOC चार्जिंगला सपोर्ट करेल, 15 मिनिटांसाठी चार्ज केल्यास ते एक दिवस टिकेल. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित OxygenOS वर चालेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल.
याव्यतिरिक्त, लीकनुसार OnePlus च्या या आगामी स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा डिस्प्ले असू शकतो. फोन 50MP मुख्य आणि 8MP सेकंडरी सेन्सरने सुसज्ज असू शकतो. यामध्ये कंपनी सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा देऊ शकते. याशिवाय फोन 5000mAh बॅटरीने सुसज्ज असू शकतो.