OnePlus Nord CE4 Lite 5G ची नवी भारतीय लाँच डेट जाहीर, नवा स्टायलिश फोन Free मध्ये जिंकण्याची संधी

OnePlus Nord CE4 Lite 5G ची नवी भारतीय लाँच डेट जाहीर, नवा स्टायलिश फोन Free मध्ये जिंकण्याची संधी
HIGHLIGHTS

OnePlus Nord CE4 Lite 5G स्मार्टफोनची नवी भारतीय लाँच डेट कन्फर्म

यापूर्वी कंपनी 18 जून रोजी OnePlus Nord CE4 Lite 5G लाँच करणार होती.

OnePlus India ने अधिकृत X (Twitter) हँडलद्वारे पोस्ट शेअर करत दिली माहिती

OnePlus Nord CE4 Lite 5G: OnePlus Nord CE4 Lite 5G स्मार्टफोनची नवी लाँच डेट कन्फर्म झाली आहे. हा कंपनीचा नवीन बजेट फोन असणार आहे. नावावरून समजलेच असेल की, हा फोन OnePlus Nord CE3 Lite 5G चा सक्सेसर असणार आहे. यापूर्वी कंपनीने घोषणा केली होती की कंपनी 18 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता एक नवीन फोन लाँच करणार आहे. मात्र, आता या फोनची नवी लाँच डेट कन्फर्म करण्यात आली आहे. एवढेच नाही तर, कंपनीने साईटवर फोनचा फर्स्ट लुक देखील उघड केला आहे.

Also Read: बहुप्रतीक्षित Motorola Edge 50 Ultra स्मार्टफोन भारतात लाँच, तब्बल 10,000 रुपयांच्या Discount सह होणार उपलब्ध

OnePlus Nord CE4 Lite 5G ची नवी लाँच डेट

OnePlus India ने त्यांच्या अधिकृत X (Twitter) हँडलद्वारे OnePlus Nord CE4 Lite 5G स्मार्टफोनच्या लाँच डेटची पुष्टी करण्यात आली आहे. हा फोन 24 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता लाँच केला जाईल. तुम्ही खालील पोस्टरमध्ये बघू शकता की, हा फोन ब्लू कलर ऑप्शनमध्ये दिसत आहे.

वरील पोस्टमध्ये तुम्ही आगामी फोनचे आकर्षक लुक बघू शकता. डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनच्या मागील बाजूस कॅप्सूल कॅमेरा मॉड्यूल दिसू शकतो. यामध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिसत आहे. मागील कॅमेराच्या खाली LED फ्लॅश देखील दिसत आहे.

OnePlus Nord CE4 Lite 5G मोफत जिंकण्याची संधी

मोफत OnePlus Nord CE4 Lite 5G जिंकण्यासाठी, तुम्हाला ब्रँडच्या अधिकृत साइटवर जावे लागेल किंवा येथे क्लिक करावे लागेल. स्वारस्य असलेल्या सहभागींनी दररोज दोन कार्ड ओपन करणे आवश्यक आहे. चारही कार्डे उघड करणारे युजर्स लकी ड्रॉ इव्हेंटमध्ये सहभागी होऊ शकतात. विजेते रँडमली निवडले जाणार आहेत. तुमच्या सहभागानंतर परिणाम पृष्ठावर दर्शविले जातील. लक्षात घ्या की, प्रत्येक वापरकर्त्याला 24 जूनपर्यंत स्पर्धेत सहभागी होण्याची एक संधी आहे.

OnePlus Nord CE4 Lite 5G चे तपशील

oneplus nord ce4 lite 5g

OnePlus Nord CE4 Lite 5G च्या लीक फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 6.67 इंच लांबीच्या डिस्प्लेसह येईल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका असेल. याशिवाय, हा फोन परफॉर्मन्ससाठी Qualcomm च्या Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज असेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. यात 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर आणि 16MP फ्रंट कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे. फोनमध्ये 5,500mAh बॅटरी असेल. मात्र, फोनचे खरे तपशील फोन लाँच झाल्यानंतरच पुढे येतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo