अप्रतिम ऑफर! OnePlus Nord CE4 Lite 5G ची भारतात आज पहिली सेल, 50MP कॅमेरासह मिळतील भारी फीचर्स 

अप्रतिम ऑफर! OnePlus Nord CE4 Lite 5G ची भारतात आज पहिली सेल, 50MP कॅमेरासह मिळतील भारी फीचर्स 
HIGHLIGHTS

लेटेस्ट OnePlus Nord CE4 Lite 5G ची विक्री आज म्हणजेच 27 जून 2024 रोजी सुरू होणार

OnePlus Nord CE4 Lite 5G फोनवर ICICI बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 1000 रुपयांची सूट मिळेल.

OnePlus ने फोनचा बेस व्हेरिएंट 19,999 रुपयांना लाँच केला आहे.

OnePlus Nord CE4 Lite 5G: OnePlus Nord CE4 Lite 5G स्मार्टफोन बऱ्याच कालावधीच्या प्रतीक्षेनंतर या आठवड्याच्या सुरुवातीला लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनची पहिली विक्री आज म्हणजेच 27 जून 2024 रोजी सुरू होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, पहिल्या सेलमध्ये स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी असेल. हा स्मार्टफोन भारतात दोन स्टोरेज व्हेरियंटमध्ये लाँच केला आहे. चला तर मग जाणून घेऊयात OnePlus Nord CE4 Lite 5G ची किंमत आणि ऑफर्स-

OnePlus-Nord-CE4-Lite-5G

OnePlus Nord CE4 Lite 5G ची पहिली सेल

OnePlus ने फोनचा 8GB रॅमसह 128GB अंतर्गत स्टोरेजसह बेस व्हेरिएंट 19,999 रुपयांना लाँच केला आहे. तसेच, या फोनचा टॉप व्हेरिएंट 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 22,999 रुपये आहे. लक्षात घ्या की, OnePlus Nord CE4 Lite 5G मध्ये मेगा ब्लू, सुपर सिल्व्हर आणि अल्ट्रा ऑरेंज कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत.

फ्लॅगशिप किलरचा नवा OnePlus Nord CE4 Lite 5G स्मार्टफोन आज दुपारी 12 वाजतापासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. हा स्मार्टफोन लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon आणि OnePlus वेबसाइटवरून खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर ICICI बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 1000 रुपयांची सूट मिळेल. याव्यतिरिक्त, प्राइम सदस्यांसाठी बेस व्हेरिएंटवर 1000 रुपयांची कूपन सूट देखील असेल. लक्षात घ्या की, प्राइम ऑफर मर्यादित काळासाठी लाईव्ह आहे.

OnePlus Nord CE4 Lite 5G चे फीचर्स आणि स्पेक्स

OnePlus Nord CE4 Lite

OnePlus Nord सीरीजच्या या फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. तसेच, या फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये OIS समर्थनासह 50MP Sony LYTIA प्रायमरी लेन्स आणि 8MP अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर आहे. तसेच, आकर्षक सेल्फीसाठी 13MP फ्रंट कॅमेरा मिळेल. हा हँडसेट 5500mAh बॅटरीने सुसज्ज आहे, जी 80W SUPERVOOC चार्जिंग सपोर्टसह येईल. बॅटरी 52 मिनिटांत 100% चार्ज होईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo