OnePlus चा सर्वात स्वस्त 5G फोन भारतात दाखल, जाणून घ्या किंमत

Updated on 05-Apr-2023
HIGHLIGHTS

OnePlus Nord CE3 lite अखेर भारतात लाँच

OnePlus buds 2 देखील लाँच करण्यात आले आहेत.

हा OnePlus चा स्वस्त 5G फोन आहे.

OnePlus Nord CE3 lite अखेर भारतात लाँच झालेला आहे. लाँचपूर्वीच या स्मार्टफोनची बरीच माहिती पुढे आली होती. यासोबतच OnePlus buds 2 देखील लाँच करण्यात आले आहेत. OnePlus चा लाँच इव्हेंट मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता होता. कंपनीचे दोन्ही उपकरणे परवणाऱ्या किमितीत लाँच करण्यात आली आहेत. चला तर मग बघुयात किंमत आणि जबरदस्त फीचर्स –

OnePlus Nord CE3 lite चे स्पेसिफिकेशन

नवीन OnePlus स्मार्टफोनमध्ये 6.72 इंच लांबीचा HD+LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. डिस्प्लेमध्ये गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन देण्यात आले आहे. या फोनमध्ये  snapdragon 695 प्रोसेसर दिला गेला आहे. यासोबत 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज सपोर्ट देखील आहे. तसेच, रॅम 16GB पर्यंत वाढवता येते आणि स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येईल. 

हा स्मार्टफोन android 13 वर बेस्ड oxygen OS 13 सह येतो. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिलेला आहे. 108mp प्रायमरी कॅमेरा, दुसरा कॅमेरा 2MP डेप्थ सेन्सर आणि तिसरा कॅमेरा 2MP चा मॅक्रो लेन्स आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंट कॅमेरा 16MP चा आहे. यामध्ये 67W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh ची बॅटरी देखील आहे. 

कनेक्टिवहिटीसाठी फोनमध्ये 5G, Wi-Fi, ब्लूटूथ 5.3, USB टाईप C पोर्ट इ. साठी सपोर्ट आहे. 

किंमत

OnePlus च्या नवीन स्मार्टफोनची किंमत 19,999 रूपये इतकी आहे. हा OnePlus चा स्वस्त 5G फोन आहे. हा फोन पेस्टल लाईम आणि chromatic ग्रे कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून खरेदी करता येईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :