Amazon ग्रेट समर सेलचा शेवटचा दिवस, OnePlusच्या 5G फोनवर जबरदस्त डील्स

Updated on 08-May-2023
HIGHLIGHTS

Amazon ग्रेट समर सेल आज संपणार

सेलमध्ये OnePlus Nord CE 3 Lite 5G त्याच्या खऱ्या किमतीपेक्षा खूपच स्वस्त

कोटक बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 1,000 रुपयांपर्यंत सूट

Amazon चा सुरु असलेला ग्रेट समर सेल 4 मे रोजी सुरू झाला होता. या सेलचा आज शेवटचा दिवस आहे. जर तुम्हाला 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत चांगला 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर या सेलमध्ये OnePlus Nord CE 3 Lite 5G त्याच्या खऱ्या किमतीपेक्षा खूपच स्वस्त मिळत आहे. चला तर मग बघूया Amazon ची ही जबरदस्त डील – 

OnePlus Nord CE 3 Lite 5G वरील डील

 Amazon सेलदरम्यान OnePlus Nord CE 3 Lite 5G चे 8GB + 128GB मॉडेल 19,999 रुपयांना सूचीबद्ध केले आहे. त्याबरोबरच, ई-कॉमर्स कंपनी या फोनवर भारी एक्सचेंज आणि बँक ऑफर देत आहे.

 बँक ऑफर्स अंतर्गत, तुम्हाला कोटक बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 1,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त 10% सूट मिळू शकते. येथून खरेदी करा

एक्सचेंज ऑफर अंतर्गत, Amazon तुम्हाला Nord CE 3 Lite 5G वर 18,950 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी देत ​​आहे. जर तुम्ही संपूर्ण एक्स्चेंज सवलत मिळवली, तर तुम्हाला हँडसेट फक्त 1,049 रुपयांमध्ये मिळणार आहे. पण लक्षात घ्या की ही व्हॅल्यू मिळवण्यासाठी तुमचा जुना फोन उत्तम स्थितीत हवा. 

OnePlus Nord CE 3 Lite 5G

OnePlus Nord CE 3 Lite 5G मध्ये 6.72-इंच लांबीचा फुल HD+ LCD डिस्प्ले मिळतो. त्याबरोबरच, स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर, 108MP + 2MP + 2MP ट्रिपल कॅमेरा सेटअप, 16MP सेल्फी सेन्सर, 5,000mAh बॅटरी आणि 67W SuperVooc फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळणार आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :