OnePlus च्या अफोर्डेबल 5G स्मार्टफोनची सेल सुरु, इयरबड्स मिळतील मोफत

OnePlus च्या अफोर्डेबल 5G स्मार्टफोनची सेल सुरु, इयरबड्स मिळतील मोफत
HIGHLIGHTS

OnePlus Nord CE 3 Lite 5G ची सेल सुरु

हा फोन Amazon इंडियावर खरेदीसाठी उपलब्ध

त्याबरोबरच, OnePlus nord buds देखील मोफत मिळणार आहेत.

OnePlus ने नुकताच एक अफोर्डेबल 5G स्मार्टफोन OnePlus Nord CE 3 Lite 5G लाँच केला आहे. कंपनीने या फोनसह OnePlus Nord Buds 2 देखील लाँच केला आहे. या स्मार्टफोनची आजपासून सेल सुरु झाली आहे. हा फोन Nord CE 2 Lite 5G चा सक्सेसर म्हणून लाँच केला गेला आहे. 

 किमंत आणि ऑफर्स

 हा फोन Amazon इंडियावर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. त्याबरोबरच कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि ऑफलाईन स्टोअर्सवर देखील लेटेस्ट फोन खरेदी करता येईल. OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन दोन कॉन्फिगरेशनसह येतो. याच्या 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये इतकी आहे. तर, 8GB+256GB  व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

त्याबरोबरच, ICICI बँक कार्डने पेमेंट केल्यास 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. त्याबरोबरच, OnePlus nord buds देखील मोफत मिळणार आहेत. याव्यतिरिक्त, फोन खरेदीसह OnePlus Nord Watch खरेदी केल्यास 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल.

OnePlus Nord CE 3 Lite 5G 

OnePlus Nord CE 3 Lite 5G फोनमध्ये 6.72 इंच लांबीचा IPS LCD डिस्प्ले मिळणार आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर मिळेल. स्मार्टफोनमध्ये (8GB+128GB) आणि (8GB+256GB) असे दोन व्हेरिएंट आहेत. 

कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, स्मार्टफोनमध्ये मेन 108MP कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो लेन्स मिळेल. आकर्षक सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा मिळेल. तसेच, फोनमध्ये 67W SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. डिवाइस Android 13 बेस्ड Oxygen OS 13.1 वर कार्य करतो. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo