OnePlus चा सर्वात स्वस्त 5G फोन लवकरच होणार लाँच, अवघ्या काही मिनिटांत होईल चार्ज

OnePlus चा सर्वात स्वस्त 5G फोन लवकरच होणार लाँच, अवघ्या काही मिनिटांत होईल चार्ज
HIGHLIGHTS

OnePlus Nord CE 3 Lite 5G भारतात होणार लाँच

हा ONEPLUS चा सर्वात स्वस्त 5G फोन असेल.

OnePlus 4 एप्रिल रोजी Nord CE 3 Lite सोबत OnePlus Nord Buds 2 लाँच करेल.

OnePlus लवर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. OnePlus लवकरच ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त 5G फोन घेऊन येत आहे. त्या फोनचे नाव OnePlus Nord CE 3 Lite 5G असे ठेवण्यात आले आहे. हा फोन भारतात 4 एप्रिल रोजी सादर केला जाईल. लाँच पूर्वी काही फीचर्स उघड झालेले आहेत. 

OnePlus Nord CE 3 Lite 5G  ची भारतात अपेक्षित किंमत 

OnePlus Nord CE 3 Lite 5G MRP 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 27,999 रुपये असू शकते. पण त्याची किंमत खूप कमी असण्याची शक्यता आहे. OnePlus 4 एप्रिल रोजी Nord CE 3 Lite सोबत OnePlus Nord Buds 2 लाँच करेल. 

अपेक्षित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

अहवालानुसार फोनमध्ये फुल-HD + रिझोल्यूशनसह 6.7-इंच लांबीचा डिस्प्ले असू शकतो. Nord CE 2 Lite 5G पेक्षा हा एक मोठा अपग्रेड आहे, ज्यामध्ये 6.59-इंचाचा डिस्प्ले आहे. कंपनी पुन्हा LCD पॅनेल वापरू शकते, तर अधिक प्रीमियम OnePlus फोनमध्ये अधिक चांगल्या पाहण्याच्या अनुभवासाठी AMOLED पॅनेल समाविष्ट आहे. डिस्प्ले 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट देत राहते.

याव्यतरिक्त, फोनच्या बॅटरीबद्दल असा दावा करण्यात आला आहे की, याद्वारे तुमचा फोन काही मिनिटांतच संपूर्ण चार्ज होईल. सविस्तरपणे बोलायला गेलो तर, या फोनमध्ये 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 500 mAh ची बॅटरी आहे. ही बॅटरी केवळ 30 मिनिटांमध्ये संपूर्ण चार्ज होईल, असा दावा करण्यात आला आहे. मात्र, कॅमेराबद्दल कंपनीने खात्रीशीर तपशील प्रकट केलेला नाही. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo