OnePlus Nord CE 4 स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात लाँच होणार आहे. कंपनीने त्याची लाँच डेट जाहीर केली आहे. लाँच होण्यापूर्वीच OnePlus ने फोनचे खास स्पेसिफिकेशन्स उघड केले आहेत. या फोनची मायक्रो वेबसाईटही Amazon वर लाईव्ह करण्यात आली आहे. यानंतर कंपनीने नुकतेच ट्विट करून फोनची रॅम आणि स्टोरेजची माहिती जाहीर केली आहे. Amazon पेजवरून त्याचा प्रोसेसरबद्दल देखील माहिती उघड झाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात तपशीलवार माहिती.
OnePlus Nord CE 4 पुढील महिन्यात भारतात लाँच केला जाईल. OnePlus चा हा स्मार्टफोन भारतीय बाजारात 1 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता लाँच होणार आहे.
OnePlus India ने आपल्या अधिकृत X म्हणजेच Twitter अकाऊंटवरून ट्विट करून आगामी OnePlus Nord CE 4 मधील RAM आणि स्टोरेज सारख्या खास फीचर्सची माहिती दिली आहे. ट्विटनुसार, फोन 8GB LPDDR4X रॅमसह आणला जाईल. यामध्ये व्हर्च्युअल रॅम देखील उपलब्ध असेल, रॅम 8GB पर्यंत वाढवता येते. अशाप्रकारे या फोनमध्ये तुम्हाला एकूण 16GB रॅम मिळेल.
फोनमध्ये 256GB इंटरनल स्टोरेज दिले जाईल. स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो SD कार्ड स्लॉट देखील उपलब्ध असेल. ज्याद्वारे 1TB पर्यंत स्टोरेज वाढवता येईल. याव्यतिरिक्त, कंपनीने Amazon पेजवर देखील पुष्टी केली आहे की, हा आगामी स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसरसह प्रदान केला जाईल. हा स्मार्टफोन डार्क क्रोम आणि सेलाडॉन मार्बल या दोन कलर ऑप्शन्समध्ये आणला जाईल.
OnePlus Nord CE 4 मध्ये 6.7 इंच लांबीचा OLED डिस्प्ले मिळू शकतो. फोटोग्राफीसाठी फोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येण्याची अपेक्षा आहे. त्याबरोबरच, 50MP मुख्य आणि 8MP अल्ट्रा-वाइड लेन्सचा समावेश असेल. आकर्षक सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. पॉवर बॅकअपसाठी यात 80W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी दिली जाऊ शकते.