OnePlus Nord CE 4 Lite 5G फोन भारतात 24 जून रोजी म्हणजेच आज लाँच होणार आहे. कंपनीने त्याच्या फोनची टीज सुरू केली असून चाहतेही आगामी फोनच्या लाँचची प्रतीक्षा करत आहेत. फ्लॅगशिप किलरचा नवा मोबाईल बाजारात येण्यापूर्वी Nord CE4 Lite ची किंमत इंटरनेटवर लीक झाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात आगामी OnePlus Nord CE 4 Lite 5G बद्दल सर्व लीक्स-
Also Read: Netflix सब्स्क्रिप्शन महाग आहेत? Airtel च्या ‘या’ अप्रतिम प्लॅन्ससह मिळेल मोफत सदस्यता
OnePlus Nord CE 4 Lite 5G फोनची किंमत प्रसिद्ध टिपस्टर Yogesh Brar ने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर हँडलवरून शेअर केली आहे. लीकनुसार, हा मोबाइल फोन 19,999 रुपयांना लाँच केला जाईल. OnePlus Nord CE 4 Lite च्या 8GB + 128GB व्हेरिएंटची ही किंमत असेल, असे सांगितले गेले आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, मागील वर्षी OnePlus Nord CE 3 Lite देखील त्याच किमतीत 19,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता.
लीकनुसार, OnePlus Nord CE 4 Lite 5G फोनमध्ये 6.67-इंच लांबीच्या FHD+ डिस्प्लेसह लाँच केला जाईल. हे पंच-होल स्टाईलचे असेल, जे AMOLED पॅनेलवर तयार केले जाईल. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका असू शकतो. स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठीमी या फोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 चिपसेट देण्यात येणार आहे. फोनमध्ये 8GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 256GB स्टोरेजला पर्याय मिळण्याची शक्यता आहे. तर, स्टोरेजसाठी 1TB मेमरी कार्ड सपोर्ट देखील मिळू शकतो.
फोटोग्राफीसाठी, OnePlus Nord CE 4 Lite 5G फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यामध्ये मागील पॅनलवर 50MP मुख्य सेन्सर प्रदान केला जाईल, जो OIS ला सपोर्ट करेल. यासह 2MP डेप्थ सेन्सर देखील उपस्थित असेल. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा देखील मिळू शकतो. पॉवर बॅकअपसाठी 5,500mAh बॅटरी दिली जाऊ शकते, जी 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येण्याची शक्यता आहे.