OnePlus Nord CE4 Lite 5G: फ्लॅगशिप किलरच्या लेटेस्ट OnePlus Nord CE4 Lite 5G स्मार्टफोन अखेर भारतीय बाजारात लाँच झाला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा कंपनीचा लेटेस्ट बजेट रेंज फोन आहे. या फोनबद्दल माहिती आणि अफवा बरेच दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु आहेत. आता अखेर कंपनीने हा स्मार्टफोन भारतात दाखल केला आहे. स्मार्टफोन कमी किमतीत आकर्षक फीचर्ससह सादर केला गेला आहे. जाणून घेऊयात OnePlus Nord CE4 Lite 5G ची किंमत, उपलब्धता आणि फीचर्सशी संबंधित सर्व तपशील-
Also Read: Netflix सब्स्क्रिप्शन महाग आहेत? Airtel च्या ‘या’ अप्रतिम प्लॅन्ससह मिळेल मोफत सदस्यता
OnePlus ने OnePlus Nord CE4 Lite 5G फोन भारतात दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. या फोनचा 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 19,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. तर, फोनच्या 8GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 22,999 रुपये इतकी आहे. हा फोन मेगा ब्लू, सुपर सिल्व्हर आणि अल्ट्रा ऑरेंज कलर ऑप्शन्समध्ये मिळेल.
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री Amazon वर 27 जून रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. लाँच ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर तुम्हाला ICICI बँक कार्डद्वारे फोनवर 1000 रुपयांची सूट मिळणार आहे. लक्षात घ्या की, मागील वर्षी OnePlus Nord CE 3 Lite देखील 19,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता.
OnePlus Nord CE4 Lite 5G फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP Sony LYTIA प्रायमरी कॅमेरासह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. प्रायमरी कॅमेरा OIS सपोर्टसह उपलब्ध आहे. तसेच, फोनमध्ये 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची बॅटरी 5500mAh आहे, ज्यामध्ये 80W SUPERVOOC चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.