OnePlus Nord CE 4 Lite 5G: OnePlus च्या आगामी स्मार्टफोन OnePlus Nord CE 4 Lite 5G च्या भारतीय लाँचची चर्चा सध्या सर्वत्र सुरु होती. आता अखेर कंपनीने OnePlus Nord CE 4 Lite 5G ची भारतीय लाँच डेट जाहीर केली आहे. त्याबरोबरच, कंपनीने Amazon वर स्मार्टफोनचे सपोर्ट पेजही लाईव्ह केले आहे. हा फोन भारतात पुढील आठवड्यात लाँच होणार आहे. कंपनी पुढील आठवड्यात होणाऱ्या कार्यक्रमात Nord सीरिजचे स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात OnePlus Nord CE 4 Lite 5G ची भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-
Also Read: Upcoming Smartphones This Week: ‘या’ आठवड्यात भारतात लाँच होणार जबरदस्त स्मार्टफोन्स, बघा यादी
OnePlus Nord सीरीजचा हा स्मार्टफोन 18 जून 2024 रोजी भारतात लाँच होईल. म्हणजेच उद्या संध्याकाळी 7 वाजता सुरू होणाऱ्या कार्यक्रमात हा स्मार्टफोन लाँच केला जाईल. वर सांगितल्याप्रमाणे, या स्मार्टफोनचे सपोर्ट पेज Amazon वर लाईव्ह करण्यात आले आहे. यासह फोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स उघड झाले आहेत.
OnePlus Nord CE 4 Lite 5G लाँचपूर्वीच स्मार्टफोनचे पेज कंपनीच्या भारतीय वेबसाइटवर लाइव्ह झाले आहे. त्याबरोबरच, स्मार्टफोनचा टीझरही लाइव्ह झाला आहे. टीझर पाहून असे समजते की, हा फोन ब्लू कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाईल. एवढेच नाही तर, फोनचे डिझाईनही टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. त्याबरोबरच, हा फोन फ्लॅट-एज डिझाइनसह येईल.
स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB रॅमसह 128GB स्टोरेज मिळेल. तर, पॉवरसाठी, फोनमध्ये 5,530mAh ची बॅटरी आहे. जी 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल, असे Amazon लिस्टिंगद्वारे पुढे आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, OnePlus Nord CE 4 Lite हँडसेट Oppo K12x चे रीब्रँडेड मॉडेल असेल. त्यानुसार, या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले मिळेल. परफॉर्मन्ससाठी यात Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर आहे. तर, या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी 50MP मेन कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. ही फीचर्स OnePlus Noed CE 4 Lite मध्ये आढळू शकतात.