मागील अनेक दिवसांपासून फ्लॅगशिप किलर OnePlus च्या नव्या फोनच्या भारतीय लाँचची चर्चा सुरु होती. अखेर OnePlus Nord CE 4 फोन भारतात लाँच करण्यात आला आहे. नावावरून समजलेच असेल की, हा फोन OnePlus Nord CE 3 ची अपग्रेडेड आवृत्ती आहे, जी मागील वर्षी लाँच झाली होती. फोनच्या विशेष फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोन Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनमध्ये 5500mAh बॅटरी आहे, जी 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध आहे. चला तर मग जाणून फोनची किंमत, उपलब्धता आणि टॉप 5 फीचर्स-
कंपनीने OnePlus Nord CE 4 फोन दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. हा फोन मिड बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनच्या 8GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. तर, 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे.
फोनच्या उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, फोनची विक्री 4 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता Amazon आणि अधिकृत OnePlus इंडिया साइटवर सुरू होणार आहे. पहिल्या सेलदरम्यान फोन खरेदी केल्यावर ग्राहकांना 2,199 रुपये किमतीचा OnePlus Nord Buds 2r अगदी मोफत मिळेल. त्यानंतर 5 एप्रिलपासून निवडक बँक कार्डद्वारे फोनवर 1500 रुपयांची ऑफर देखील उपलब्ध उपलब्ध होणार आहे.
OnePlus Nord CE 4 मध्ये 6.7 इंच लांबीचा FHD+ LTPS AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. विशेष म्हणजे हा एक एक्वा टच डिस्प्ले आहे. म्हणजेच हा डिस्प्ले तुम्ही ओल्या हातानेही वापरू शकता.
स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. गेमिंगच्या बाबतीत, स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 निवडक स्नॅपड्रॅगन एलिट गेमिंग फीचर्ससह वरील स्तरावर परफॉर्मन्स प्रदान करते.
स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 8GB LPDDR4x रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. फोनचे स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP Sony LYT-600 प्रायमरी कॅमेरा आहे. यात OIS सपोर्ट देखील उपलब्ध आहे. त्याबरोबरच, कॅमेरा सेटअपमध्ये 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
फोनमध्ये 5,500mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. हा फोन फक्त 29 मिनिटांत 0 ते 100% चार्ज होईल, असा कंपनीचा दावा आहे.