OnePlus ने अधिकृतपणे घोषित केले आहे की, भारतात आपला आगामी OnePlus Nord CE 4 स्मार्टफोन लाँच करणार आहे. या फोनला कंपनीचा या वर्षातील दुसरा फोन म्हणता येईल. अलीकडेच कंपनीने OnePlus 12 सिरीज भारतीय बाजारात सादर केली आहे. OnePlus Nord CE 4 स्मार्टफोन OnePlus Nord CE 3 पिढीचा नवीन फोन म्हणून लाँच केला जाऊ शकतो.
हे सुद्धा वाचा: 108MP कॅमेरासह POCO X6 Neo भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स। Tech News
कंपनीने सांगितले की, OnePlus Nord CE 4 स्मार्टफोन 1 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता लाँच होणार आहे. या फोनबाबत Amazon India वर एक मायक्रोसाइटही सुरू करण्यात आली आहे. मायक्रोसाईटवर तुम्हाला ‘Notify Me’ बटन देखील देण्यात आले आहे.
टीझर इमेजवरून हे देखील समोर आले आहे की, फोनच्या उजव्या बाजूला पॉवर बटण आणि व्हॉल्यूम रॉकर बटन्स ठेवली जाऊ शकतात. त्याबरोबरच, या फोनमध्ये IR ब्लास्टर देखील असणार आहे. हे फिचर सर्वप्रथम अलीकडेच लाँच झालेल्या OnePlus 12 मध्ये दिसले. याशिवाय, OnePlus Nord CE 4 स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देखील असू शकतो, जो LED रिंग फ्लॅशने सुसज्ज असणार आहे.
एवढेच नाही तर OnePlus Nord CE 4 स्मार्टफोन उत्तम परफॉर्मन्ससाठी Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो. फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देखील असणार आहे. यात 8MP दुय्यम कॅमेरासह 50MP प्राथमिक कॅमेरा देखील असू शकतो. याशिवाय, 16MP सेल्फी कॅमेरा देखील असण्याची शक्यता आहे.
याव्यतिरिक्त, एका टीझरमध्ये असे दिसून आले आहे की, फोन दोन वेगवेगळ्या कलर ऑप्शन्समध्ये ऑफर केला जाऊ शकतो. फोन डार्क क्रोम आणि सेलेडॉन मार्बल कलरमध्ये ऑफर केला जाऊ शकतो.