OnePlus Nord CE 4 स्मार्टफोन भारतात 1 एप्रिल रोजी लाँच होणार आहे. लाँचच्या काही दिवसांपूर्वी या फोनची किंमत ऑनलाइन लीक झाली आहे. आगामी स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची चर्चा टेक विश्वात जोरात सुरु आहे. केवळ किंमतच नाही तर अलीकडेच फोनचे फीचर्सही ऑनलाइन समोर आले आहेत. लीक फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर या फोन मध्ये 6.7 इंच AMOLED डिस्प्ले असेल. विशेष म्हणजे या फोनमध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल, ज्यामध्ये फोन फक्त 29 मिनिटांत 100% चार्ज करण्याची क्षमता आहे. चला तर मग जाणून घेऊयात OnePlus Nord CE 4 बाबतचे सर्व लीक्स-
हे सुद्धा वाचा: भारतातील सर्वात स्लिम Tecno स्मार्टफोन 29 मार्च रोजी होणार लाँच, नव्या फोनमध्ये मिळतील Powerful फीचर्स। Tech News
प्रसिद्ध टीपस्टर Abhishek Yadav ने OnePlus Nord CE 4 लाँच होण्यापूर्वी त्याची किंमत ऑनलाइन लीक केली आहे. लीकनुसार फोनची सुरुवातीची किंमत 24,999 रुपये असेल, ज्यामध्ये फोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट ऑफर केला जाईल. तर, यामध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल देखील असेल, ज्याची किंमत 26,999 रुपये असण्याची शक्यता आहे. मात्र, फोनची खरी किंमत 1 एप्रिलला स्पष्ट होईल.
वर सांगितल्याप्रमाणे OnePlus Nord CE 4 चे तपशील ऑनलाईन लाँचपूर्वीच लीक झाले आहेत. लीकनुसार, OnePlus Nord CE 4 फोन मध्ये 6.7-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले असेल, डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. याशिवाय, उत्तम परफॉर्मन्ससाठी हा फोन Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज असेल. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 8GB LPDDR4x रॅम आणि 8GB व्हर्च्युअल रॅम मिळण्याची शक्यता आहे.
याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी OnePlus फोनमध्ये 50MP Sony LYT-600 प्रायमरी कॅमेरा असू शकतो, ज्यासह OIS समर्थन देखील मिळेल. यासोबत 8MP चा अल्ट्रा-वाइड सेन्सर देखील दिला जाईल. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP कॅमेरा दिला जाईल. पॉवरसाठी फोनमध्ये 5500mAh बॅटरी असेल, ज्यामध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल. मात्र, फोनचे योग्य तपशील लाँचनंतरच स्पष्ट होतील.