Good News! OnePlus Nord CE3 फोनच्या किमतीत तब्बल 4000 रुपयांची मोठी कपात, जाणून घ्या नवीन किंमत। Tech News 

 Good News! OnePlus Nord CE3 फोनच्या किमतीत तब्बल 4000 रुपयांची मोठी कपात, जाणून घ्या नवीन किंमत। Tech News 
HIGHLIGHTS

कंपनीचा लोकप्रिय स्मार्टफोन OnePlus Nord CE3 च्या किमतीत मोठी कपात

या फोनच्या 8GB रॅम मॉडेलची किंमत 4000 रुपयांनी कमी

OnePlus Nord CE3 नवीन किमतीसह कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.

OnePlus च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, अलीकडेच OnePlus Nord CE4 लाँच केला आहे. त्यानंतर कंपनीने जुने मॉडेल स्वस्त केले आहे. होय, कंपनीचा लोकप्रिय स्मार्टफोन OnePlus Nord CE3 च्या किमतीत मोठी कपात झाली आहे. कंपनीने हा फोन गेल्या वर्षी लाँच केला होता.या फोनची किंमत 4000 रुपयांनी कमी केली आहे. या फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz इतका आहे. त्याबरोबरच, या फोनमध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात OnePlus Nord CE3 फोनची नवी किंमत-

हे सुद्धा वाचा: 6000mAh बॅटरीसह येणारा लेटेस्ट स्मार्टफोन Moto G64 5G ची पहिली Sale आज! मिळणार Best ऑफर्स

OnePlus Nord CE 3 5G

OnePlus Nord CE3 फोनची नवी किंमत

OnePlus Nord CE3 फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएं 26,999 रुपयांमध्ये लाँच केला आहे. वर सांगितल्याप्रमाणे, या फोनची किंमत कमी करण्यात आली आहे. होय, या फोनच्या 8GB रॅम मॉडेलची किंमत 4000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. कपातीनंतर हा फोन आता केवळ 22,999 रुपयांना खरेदी करता येईल. OnePlus Nord CE3 नवीन किमतीसह कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.

OnePlus Nord CE3 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, OnePlus Nord CE3 मध्ये 6.7 इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. याशिवाय, हा फोन Qualcomm Snapdragon 782G प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल उपलब्ध आहे. या फोनमध्ये ग्रे शिमर आणि एक्वा सर्ज असे दोन कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत.

OnePlus Nord CE 3 5G Price Cut
OnePlus Nord CE 3 5G Price Cut

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यामध्ये 50MP सोनी IMX890 प्रायमरी कॅमेरा मिळेल. त्याबरोबरच, यात 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सरचा समावेश आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी, या फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यामध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. हा फोन Android 13 आधारित OxygenOS 13.1 वर काम करतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo