Price Cut: OnePlusच्या लोकप्रिय 5G स्मार्टफोनच्या किमतीत घट, जाणून घ्या नवे दर

Updated on 20-Jun-2023
HIGHLIGHTS

OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोनच्या किमतीत कपात

दोन्ही व्हेरिएंटच्या किमतीत 2,000 कपात करण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येतो.

OnePlus Nord CE 2 Lite Price Cut: OnePlusचा लोकप्रिय फोन म्हणजेच OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोनच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. हा फोन मागील वर्षी एप्रिलमध्ये लाँच करण्यात आला होता. संपूर्ण एका वर्षानंतर कंपनीने या स्मार्टफोनच्या किमतीत घट केली आहे. या स्मार्टफोनमध्ये 64MPचा प्रायमरी कॅमेरा उपलब्ध आहे. हा फोन ब्लू टाइड आणि ब्लॅक डस्क कलर पर्यायांमध्ये येतो. चला तर मग जाणून घेऊयात फोनची नवी किंमत –    

OnePlus Nord CE 2 Lite ची नवी किंमत

OnePlus Nord CE 2 Lite 5G फोन दोन व्हेरिएंटमध्ये येतो. दोन्ही व्हेरिएंटच्या किमतीत 2,000 कपात करण्यात आली आहे. फोनच्या 6GB रॅम+128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 19,999 रुपये होती, आता तुम्ही फोनचा 6GB रॅम व्हेरिएंट 17,999 रुपयांना मिळणार आहे. तर, 8GB रॅम+128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 21,999 रुपये होती. तर, आता 8GB रॅम व्हेरिएंट 19,999 रुपयांना उपलब्ध आहे.

OnePlus Nord CE 2 Lite

वनप्लस फोनमध्ये 6.59 इंच फुल HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. याशिवाय, हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यासह 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज मिळेल. 

त्याबरोबरच, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येतो. यात 64MP प्रायमरी कॅमेरा, 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. फ्रंट कॅमेरामध्ये यात 16MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :