आकर्षक ऑफर! OnePlus Nord 3 5G खरेदी केल्यास OnePlus Nord Buds 2R पूर्णपणे मोफत

Updated on 15-Sep-2023
HIGHLIGHTS

OnePlus Nord 3 5G खरेदी केल्यास ग्राहकांना मिळेल आकर्षक भेट

ही ऑफर Amazon आणि OnePlus या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे.

निवडक बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे फोनवर 2000 रुपयांची सूट देखील उपलब्ध आहे.

फ्लॅगशिप किलर OnePlus चे स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. OnePlus Nord 3 5G स्मार्टफोन जुलैमध्ये भारतात लाँच झाला होता. मात्र, आता हा फोन खरेदी करून वापरकर्त्यांना आकर्षक गिफ्ट सुद्धा मिळणार आहे. खरं तर, कंपनी या फोनच्या स्मार्टफोन खरेदीसह OnePlus Nord Buds 2R पूर्णपणे मोफत देत आहे, ज्याची किंमत 2,199 रुपये आहे. विशेष बाब म्हणजे ही ऑफर Amazon आणि OnePlus या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे. 

OnePlus Nord 3 5G किंमत

OnePlus Nord 3 5G स्मार्टफोन 33,999 रुपयांना येतो, ज्यामध्ये फोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. तर, 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंट 37,999 रुपयांना सूचिबद्ध आहे.

 

ऑफर्स

 वर सांगितल्याप्रमाणे, तुम्ही Amazon किंवा OnePlus साइटवरून OnePlus Nord 3 5G स्मार्टफोन खरेदी केल्यास, तुम्हाला OnePlus Nord Buds 2R buds अगदी मोफत मिळत आहेत. या बड्सची किंमत 2,199 रुपये आहे. याव्यतिरिक्त, Axis, Citi आणि OneCard क्रेडिट कार्डद्वारे फोनवर 2000 रुपयांची सूट देखील उपलब्ध आहे. 

OnePlus Nord 3 5G

OnePlus Nord 3 फोनमध्ये 6.74 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, या डिस्प्लेसह 120Hz रिफ्रेश रेट आहे. या डिस्प्लेसह स्क्रीन ब्रेकेजची शक्यता फार कमी असते. याशिवाय, हा फोन MediaTek Dimensity 9000 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये तुम्हाला 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळेल. चिपसेटमध्ये उत्कृष्ट एकूण कार्यक्षमतेसाठी आणि अगदी गेमिंगसाठी समर्थनासाठी प्रभावी CPU आणि GPU स्पेक्स आहेत. हा फोन Android 13-आधारित OxygenOS 13.1 वर काम करतो.

त्याबरोबरच, फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये तुम्हाला 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात OIS च्या सपोर्टसह 50MP Sony IMX890 प्राथमिक कॅमेरा आहे. तसेच, फोनमध्ये 8MP अल्ट्रा-वाइड Sony IMX355 कॅमेरा आणि 2MP मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP कॅमेरा आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :