बहुप्रतीक्षित OnePlus Nord 4 स्मार्टफोन अखेर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful स्पेक्स
OnePlus चा OnePlus Summer Launch इव्हेंट इटलीमध्ये पार पडला.
OnePlus Nord 4 फोन इव्हेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.
या इव्हेंटदरम्यान स्मार्टफोनसह OnePlus Pad 2, OnePlus Nord Buds 3 Pro आणि OnePlus Watch 2R देखील लाँच
नुकतेच फ्लॅगशिप किलर OnePlus चा OnePlus Summer Launch इव्हेंट इटलीमध्ये पार पडला. या इव्हेंटदरम्यान कंपनीने अनेक नवीन डिवाइस सादर केले आहेत. इव्हेंटदरम्यान भारतात OnePlus Nord 4, OnePlus Pad 2, OnePlus Buds 3 Pro आणि OnePlus Watch 2R देखील लाँच केले आहेत. OnePlus चाहते नव्या OnePlus Nord 4 ची आतुरतेने प्रतीक्षा करत होते. अखेर हा फोन भारतात लाँच करण्यात आला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात OnePlus Nord 4 ची किमत आणि सर्व तपशील-
OnePlus Nord 4 ची भारतीय किंमत
OnePlus Nord 4 कंपनीचा नवा स्मार्टफोन OnePlus Nord 3 चा सक्सेसर आहे. कंपनीने OnePlus Nord 4 च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची 29,999 रुपये इतकी निश्चित केली आहे. तर, फोन 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटमध्ये देखील येतो, ज्याची किंमत 32,999 रुपये आहे. अखेर, टॉप 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजची किंमत 35,999 रुपये इतकी आहे.
All hail metal! Meet the all-new #OnePlusNord4 with a durable metal unibody and 6 years of software support – tough on the outside, and on the inside.
— OnePlus India (@OnePlus_IN) July 16, 2024
Pre-order starts from July 20. pic.twitter.com/oVQLSjY13j
OnePlus Nord 4 ची प्री-ऑर्डर 20 जुलैपासून सुरू होईल, जी 30 जुलैपर्यंत सुरू राहील. तर, या फोनची विक्री 2 ऑगस्टपासून LIVE होईल. लाँच ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI बँक कार्ड डिस्काउंटसह या फोनवर अप्रतिम डिस्काउंट ऑफर्स उपलब्ध असतील.
OnePlus Nord 4 चे फीचर्स आणि स्पेक्स
OnePlus Nord 4 6.74-इंच लांबीच्या 1.5K OLED स्क्रीनवर लाँच करण्यात आला आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटसह येते. आत इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सारखी फीचर्स आहेत. या फोनमध्ये स्मूथ फंक्शनिंगसाठी Qualcomm Snapdragon 7+ Gen 3 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनीने दावा केला आहे की या फोनला 4 वर्षांपर्यंत Android OS अपडेट्स मिळतील.
OnePlus Nord 4 5G फोन फोटोग्राफीसाठी ड्युअल रिअर कॅमेरा सपोर्ट आहे. यात OIS तंत्रज्ञानासह 50MP मुख्य सेन्सर आणि 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स देण्यात आली आहे. तर, सेल्फीसाठी या फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5500mAh बॅटरी आहे, जी 100W फास्ट चार्जिंगच्या समर्थनासह उपलब्ध आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile