OnePlus Nord 4 5G: प्रसिद्ध फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus Nord 4 च्या भारतीय लाँचची चर्चा बरेच दिवसांपासून सुरु आहे. अखेर या स्मार्टफोनची लाँच डेट समोर आली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, या आठवड्याच्या सुरुवातीला कंपनीने आपल्या ‘Summer Launch Event’ ची घोषणा केली होती. होय, कंपनी 16 जुलै 2024 रोजी समर लाँच इव्हेंटचे आयोजन करण्यात येणार आहे.
नुकतेच OnePlus ने या इव्हेंटमध्ये लाँच होणाऱ्या सर्व प्रोडक्ट्सची यादी जारी केली आहे. यामध्ये Nord सीरिजच्या नवीन फोनचाही समावेश आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती-
Also Read: दरवाढीनंतरही मिळेल Unlimited 5G इंटरनेटची मजा, बघा Jio आणि Airtel चे ‘हे’ रिचार्ज प्लॅन्स
OnePlus Nord 4 5G स्मार्टफोन येत्या 16 जुलै 2024 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता भारतात लाँच केला जाईल. इव्हेंटदरम्यान, फोन्सशिवाय इतरही अनेक उपकणे या कार्यक्रमात सादर करण्यात येणार आहेत. इव्हेंटमध्ये नवीन फ्लॅगशिप टॅबलेट OnePlus Pad 2, OnePlus Nord Buds 3 Pro आणि OnePlus Watch 2R अशी जबरदस्त उपकरणे लाँच होणार आहेत.कंपनीच्या YouTube चॅनलवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा कार्यक्रम LIVE बघू शकता.
लीकनुसार, OnePlus Nord 4 ची डिझाईन नुकतेच चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या Ace 3V पेक्षा वेगळी असेल, अशी माहिती मिळाली आहे. या फोनमध्ये 6.74 इंच लांबीचा 1.5K 2.8D कर्व डिस्प्ले मिळू शकतो. परफॉर्मन्ससाठी हा फोन Snapdragon 7+ Gen 3 SoC ने सुसज्ज असेल. एवढेच नाही तर, लीकनुसार कंपनी फोनमध्ये 50MP मेन कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर देऊ शकते. तर पॉवरसाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे, जी 100W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करेल.
आगामी OnePlus Pad 2 मध्ये अलीकडेच चीनमध्ये लाँच झालेल्या OnePlus Pad Pro सारखे फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे. यात 12.1 इंचाचा डिस्प्ले असू शकतो. यामध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. या टॅबलेटमध्ये 13MP रियर कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. डिव्हाइसला 67W SUPERVOOC चार्जिंग सपोर्टसह 9500mAh बॅटरी मिळण्याची अपेक्षा आहे.
त्याबरोबरच, OnePlus Watch 2R मध्ये WearOS मिळू शकते. स्मार्टवॉचमध्ये eSIM चे समर्थन मिळण्याची अपेक्षा नाही. तसेच, त्यात NFC उपलब्ध नसेल. ही OnePlus Watch 2 ची लाइट आवृत्ती असू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.