Oneplus 12 आणि OnePlus 12R भारतात 23 जानेवारी 2024 रोजी लाँच होणार आहेत.
OnePlus Nord 30 SE 5G या ब्रँडच्या आणखी एका नवीन डिव्हाइसची माहिती समोर आली आहे.
हा आगामी OnePlus 5G फोन बेंचमार्किंग साइट आणि प्रमाणपत्र साइटवर सूचीबद्ध केला गेला आहे.
OnePlus चे आगामी आणि बहुप्रतीक्षित स्मार्टफोन्स Oneplus 12 आणि OnePlus 12R भारतात 23 जानेवारी 2024 रोजी लाँच होणार आहेत. भारतात नवीन OnePlus नंबर सीरिज येण्यापूर्वी, आज OnePlus Nord 30 SE 5G या ब्रँडच्या आणखी एका नवीन डिव्हाइसची माहिती समोर आली आहे. हा आगामी OnePlus 5G फोन बेंचमार्किंग साइट आणि प्रमाणपत्र साइटवर सूचीबद्ध केला गेला आहे. याद्वारे फोनचे अनेक महत्त्वाचे तपशील पुढे आले आहेत.
वर सांगितल्याप्रमाणे, हा स्मार्टफोन प्रमाणपात्र साईटवर सूचिबद्ध केला गेला आहे. होय, Nord 30 SE 5G फोन Geekbench वर OnePlus CPH2605 मॉडेल नंबरसह सूचीबद्ध आहे. ही लिस्टिंग 16 जानेवारी 2024 रोजी करण्यात आली आहे. Geekbench वर, हा मोबाईल Android 13 ऑपरेटिंग सिस्टमने सुसज्ज दाखवण्यात आला आहे. OnePlus Nord 30 SE 5G फोन 4GB रॅम सह Geekbench वर सूचीबद्ध आहे.
लिस्टिंगद्वारे हे देखील समोर आले आहे की, फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर आहे जो 2-कोर + 6-कोरने बनलेला आहे. OnePlus Nord 30 SE 5G च्या प्रोसेसरचा क्लॉक स्पीड 2.20 GHz पर्यंत आहे. एवढेच नाही तर, फोनच्या मदरबोर्ड विभागात MediaTek Dimensity 6020 चिपसेट दिला जाईल, हे देखील पुढे आले आहे.
OnePlus Nord 30 SE 5G फोनच्या वरील गीकबेंच लिस्टमध्ये समोर आलेले स्पेसिफिकेशन्स पाहता, हा फोन कमी किमतीत लाँच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, Nord 30 SE हा बाजारातील OnePlus चा सर्वात स्वस्त 5G फोन बनेल, अशी अपेक्षा केली आजच्या आहे. मात्र, सध्या या फोनच्या लाँचबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लक्षात घ्या की, फोनबद्दल सर्व खात्रीशीर माहिती लाँच झाल्यावरच पुढे येईल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.