लाँच आधीच OnePlus Nord 3 ची किंमत लीक, जाणून घेऊयात संभावित फीचर्स

Updated on 18-May-2023
HIGHLIGHTS

OnePlus Nord 3 5G फोनच्या संभावित किंमत

फोन 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह लाँच होण्याची शक्यता

फोनच्या मागील पॅनलवर 50-मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर असू शकतो.

स्मार्टफोनसाठी लोकप्रिय कंपनी OnePlus लवकरच भारतीय बाजारपेठेत आपला आगामी 'Nord' सिरीजचा नवीन स्मार्टफोन OnePlus Nord 3 5G लाँच करू शकते. या मोबाईलशी संबंधित अनेक लीक समोर येत आहेत. त्यामुळे फोनबद्दल बरीच चर्चा सुरु आहे. मात्र आज एका नव्या लीकद्वारे OnePlus Nord 3 5G फोनच्या संभावित किमितीबद्दल माहिती मिळाली आहे. बघुयात संभावित किंमत, फीचर्स आणि स्पेक्स – 

OnePlus Nord 3 5G ची अपेक्षित किंमत

OnePlus Nord 3 5G फोनशी संबंधित हा मोठा लीक प्रसिद्ध टिपस्टर योगेश बरार यांनी शेअर केला आहे. एका ट्विटद्वारे योगेश बरार यांनी सांगितले की, Nord 3 5G ची किंमत 30,000 ते 32,000 रुपयांच्या दरम्यान असेल. ही फोनच्या बेस व्हेरिएंटची किमंत असू शकते. 

OnePlus Nord 3 5G चे संभावित स्पेक्स

OnePlus Nord 3 5G फोन मोठ्या 6.74-इंच स्क्रीनसह लाँच केला जाईल. लीकनुसार, फोनमध्ये AMOLED पॅनलवर वापरला जाईल आणि 120Hz रिफ्रेश रेट असेल. हा मोबाईल Android 13 आधारित OxygenOS 13 वर लॉन्च केला जाऊ शकतो. लीकनुसार, फोनमध्ये MediaTek Dimensity 9000 octa-core प्रोसेसर दिला जाईल.

त्याबरोबरच, फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी 5,000 mAh बॅटरी दिली जाऊ शकते, जी 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येण्याची शक्यता आहे. तसेच, फोनच्या मागील पॅनलवर 50-मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर, 8MP चा सेकंडरी लेन्स आणि 2MP चा थर्ड सेन्सर असू शकतो. फोनच्या फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असण्याची शक्यता आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :