लोकप्रिय Oneplus कंपनी आज 5 जुलै रोजी Nord Summer Launch कार्यक्रम आयोजित करणार आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी अनेक डिव्हाइस लाँच करणार आहे. म्हणजेच इव्हेंटमध्ये OnePlus Nord 3, OnePlus Nord CE 3 आणि OnePlus Nord Buds 2r लाँच होणार आहेत.
स्मार्टफोन लाँच करण्यापूर्वी कंपनीने Oneplus Nord 3 आणि OnePlus Nord CE 3 च्या अनेक फीचर्सची पुष्टी केली आहे. चला तर मग वनप्लस लाँच इव्हेंटशी संबंधित सर्व तपशील बघुयात.
OnePlus Nord समर लाँच इव्हेंट आज, 5 जुलै रोजी संध्याकाळी 7 वाजता भारतात सुरू होणार आहे. लाँच इव्हेंटचे लाईव्ह स्ट्रीम तुम्हाला अर्थातच कंपनीच्या Youtube चॅनेलवर बघता येईल. तुम्ही वरील व्हीडिओवर क्लिक करून देखील लाँच इव्हेंटचा आस्वाद घेऊ शकता.
OnePlus Nord 3 ची भारतात किंमत 32,999 रुपयांपासून सुरू होईल. फोनमध्ये टेम्पेस्ट ग्रे आणि मिस्टी ग्रीन हे दोन कलर ऑप्शन असतील. तर, OnePlus Nord CE 3 बद्दल सांगितले जात आहे की त्याची किंमत जवळपास 25,000 रुपये असण्याची शक्यता आहे. या सर्व उपकरणांची विक्री OnePlus India आणि Amazon वरून होणार आहे.
OnePlus Nord 3 5G स्मार्टफोनच्या अनेक प्रमुख फीचर्सची पुष्टी झाली आहे. OnePlus Nord 3 फोनमध्ये 6.74 इंच लांबीचा फ्लॅट डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह असेल. यामध्ये 16GB पर्यंत रॅम मिळेल, असे कंपनीने सांगितले आहे. या व्यतिरिक्त, कॅमेरा स्पेक्सची सुद्धा कंपनीने पुष्टी केली आहे. OnePlus Nord 3 5G स्मार्टफोनला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. या सेटअपमध्ये Sony IMX890 प्रायमरी सेन्सर असेल, ज्यासह OISचा सपोर्ट असेल.