OnePlus आपल्या आगामी स्मार्टफोनची म्हणजेच OnePlus Nord 3 च्या लाँचची तयारी करत आहे. डिवाइस ग्लोबल आणि भारतीय बाजारात लाँच होणार आहे. यापूर्वीच, Nord 3 ला बऱ्याच सर्टिफिकेशन साईटवर पाहिले गेले आहे, ज्यामध्ये फीचर्सचे संभावित तपशील उघड झाले आहेत. टीपस्टरने स्मार्टफोनची संभावित किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सवरून पडदा काढला आहे.
अलीकडेच टिपस्टर योगेश बरार ने एका ट्विटमध्ये सांगितले होते की, OnePlus सध्या भारतीय आणि ग्लोबल लाँचसाठी OnePlus Nord 3ची टेस्टिंग करत आहे. टिपस्टरनुसार फोन, पुढील 6 ते 8 आठवड्यात लाँच केले जाईल. म्हणजेच हा डिवाइस मिड ऑफ मे किंवा मिड ऑफ जूनमध्ये लाँच होणार आहे.
OnePlus Nord 3 मध्ये 6.7 इंच लांबीचा 1.5k AMOLED डिस्प्ले मिळेल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz रिफ्रेश रेटचे समर्थन करेल. डिवाइस octa-core मीडियाटेक डायमेन्सिटी 9000 5G SoC ने सज्ज असेल. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळणार आहे, जी 80W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करेल. त्याबरोबरच, फोनमध्ये 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळण्याची अपेक्षा आहे.
कॅमेरा स्पेक्समध्ये, प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा मिळण्याची शक्यता आहे. तसेच 8 मेगापिक्सेलचा लेन्स आणि 2 मेगापिक्सेलचा सेन्सर मिळेल. फोनमध्ये, आकर्षक सेल्फीसाठी 16MPचा फ्रंट कॅमेरा मिळण्याची अपेक्षा आहे. फोनची अपेक्षित भारतीय किंमत 30 ते 40 हजार रुपयांअंतर्गत असण्याची शक्यता आहे.