OnePlus Nord 3 Leaks: प्रसिद्ध कंपनीच्या आगामी स्मार्टफोनची लाँच डेट कन्फर्म, किंमत लीक

OnePlus Nord 3 Leaks: प्रसिद्ध कंपनीच्या आगामी स्मार्टफोनची लाँच डेट कन्फर्म, किंमत लीक
HIGHLIGHTS

OnePlus आपला जबरदस्त आगामी स्मार्टफोन लाँच करण्यास सज्ज

ताज्या अहवालात, OnePlus Nord 3ची लाँच डेट जाहीर करण्यात आली आहे.

लीकनुसार, 8GB रॅम + 128GB स्टोरेजची भारतात किंमत 32,999 रुपये

प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी OnePlus आपला जबरदस्त आगामी स्मार्टफोन लाँच करण्यास सज्ज झाला आहे. कंपनी पुढील महिन्यात जुलैमध्ये एक मोठा लाँच इव्हेंट आयोजित करणार आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी OnePlus Nord 3 स्मार्टफोनसह इतर अनेक डिव्हाइस लाँच करण्याची शक्यता आहे. ताज्या अहवालात, OnePlus Nord 3 ची लाँच डेट जाहीर करण्यात आली आहे. या इव्हेंटमध्ये, OnePlus Nord 3 सोबत कंपनी OnePlus Nord CE 3 आणि OnePlus Nord Buds 2r देखील सादर करणार, अशी अपेक्षा आहे. 

OnePlus Nord 3 लाँच डेट 

ताज्या अहवालामध्ये वनप्लस कम्युनिटी फोरमचा हवाला देत  वनप्लस नॉर्ड लाँच इव्हेंटची डेट निश्चित केली गेली आहे. रिपोर्टमध्ये एक पोस्टर शेअर करण्यात आले आहे. त्या पोस्टरमध्ये वनप्लस नॉर्ड समर लॉन्च इव्हेंट 5 जुलै रोजी होणार आहे, असे दिसून येते. हा कार्यक्रम संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.

OnePlus Nord 3 ची लीक प्राईस 

प्रसिद्ध टिपस्टरने अलीकडेच OnePlus Nord 3 स्मार्टफोनची किंमत लीक केली आहे. लीक्सनुसार हा फोन भारतात दोन व्हेरिएंटमध्ये दाखल होईल. 8GB रॅम + 128GB स्टोरेजची भारतात किंमत 32,999 रुपये असेल. तर, 16GB RAM + 256GB स्टोरेजची किंमत भारतात 36,999 रुपये असण्याची शक्यता आहे.

लीक्सनुसार, या फोनमध्ये 6.74-इंच लांबीचा 1.5K AMOLED डिस्प्ले 120hz रिफ्रेश रेटसह येऊ शकतो. याशिवाय हा फोन MediaTek Dimensity 9000 प्रोसेसरने सुसज्ज असणार आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 8MP सेकंडरी कॅमेरा आणि 2MP चा तिसरा कॅमेरा उपलब्ध असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंट साईडला 16MP कॅमेरा दिला जाऊ शकतो. त्याबरोबरच, फोनमध्ये 5000mAh बॅटरी 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळू शकते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo