Good News! लेटेस्ट OnePlus Nord 3 5G फोन झाला 4,000 रुपयांनी स्वस्त, नवीन किंमत साइटवर Live। Tech News

Updated on 29-Dec-2023
HIGHLIGHTS

लेटेस्ट OnePlus Nord 3 5G स्मार्टफोनच्या किमतीत प्रचंड मोठी कपात

कंपनीने हा स्मार्टफोन एक दोन नव्हे तर तब्बल 4000 रुपयांनी स्वस्त केला आहे.

फोनमध्ये सोनी IMX890 सेन्सरसह 50MP प्रायमरी कॅमेरा आहे

Oneplus स्मार्टफोन भारतीय ग्राहकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. OnePlus च्या चाहत्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. अलीकडेच लाँच झालेल्या OnePlus Nord 3 5G स्मार्टफोनच्या किमतीत प्रचंड मोठी कपात झाली आहे. कंपनीने हा स्मार्टफोन एक दोन नव्हे तर तब्बल 4000 रुपयांनी स्वस्त केला आहे. हा फोन या वर्षी जुलैमध्ये लाँच करण्यात आला होता. हा कंपनीचा मिड बजेट रेंजचा स्मार्टफोन आहे, जो लाँच होताच लोकप्रिय झाला होता. चला तर मग जास्त वेळ न घालवता या फोनची नवी किंमत जाणून घेऊयात.

Oneplus Nord 3 5G

OnePlus Nord 3 5G ची नवी किंमत

OnePlus Nord 3 5G फोन दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. पूर्वी या फोनच्या 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 33,999 रुपये होती. तर, त्याच्या 16GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 37,999 रुपये आहे. वर सांगितल्याप्रमाणे, आता कंपनीने हा फोन कायमस्वरूपी तब्बल 4000 रुपयांनी स्वस्त केला आहे. नवी किंमत कंपनीच्या अधिकृत साईटवर लाईव्ह करण्यात आलेली आहे.

किमतीत कपात झाल्यानंतर तुम्ही हा फोन अनुक्रमे 29,999 आणि 33,999 रुपयांना खरेदी करू शकता. या फोनमध्ये मिस्टी ग्रीन आणि टेम्पेस्ट ग्रे असे दोन कलर ऑप्शन्स मिळतील.

OnePlus Nord 3 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus Nord 3 5G Price Cut

OnePlus Nord 3 5G फोनमध्ये 6.74 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी हा फोन MediaTek Dimensity 9000 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. या प्रोसेसरसह तुम्हाला उत्तम इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि अप्रतिम गेमिंग अनुभव मिळणार आहे. या फोनमध्ये तुम्हाला 16GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळेल. सुरक्षेसाठी या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात सोनी IMX890 सेन्सरसह 50MP प्रायमरी कॅमेरा आहे, ज्यासह OIS सपोर्ट देखील आहे. याशिवाय, यात 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 80W SuperVOOC चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :