OnePlus ने मागील महिन्यात युरोपमध्ये Nord 2T सादर केला होता आणि भारतीय लाँचबद्दल देखील संकेत मिळाले आहेत. आता फोनची लॉन्च तारीख, कलर, मेमरी वेरिएंट आणि किंमत याबद्दल देखील माहिती मिळाली आहे. OnePlus Nord 2T ची किंमत मागील वर्षी भारतात लाँच करण्यात आलेल्या OnePlus Nord 2 सारखी असण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, OnePlus Nord 2T भारतात 27 जून रोजी लाँच होणार आहे. हा फोन शॅडो ग्रे आणि जेड फॉग कलर ऑप्शन्समध्ये येईल. याशिवाय, डिव्हाइसला 8GB + 128GB आणि 12GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंट मध्ये आणले जाईल.
हे सुद्धा वाचा : Tecno Pova 3 स्मार्टफोन लाँच, 33W चार्जिंग आणि 7000mAh बॅटरीसह भारतातील पहिला फोन
OnePlus Nord 2T च्या बेस व्हेरिएंटची किंमत 28,999 रुपये असेल, तर हाय व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपये असेल. बँकेच्या ऑफरसह, ग्राहक 4,000 रुपयांच्या सवलतीसह हा फोन खरेदी करू शकतील. लीकवरून मिळालेल्या माहितीनुसार, डिवाइस 3 ते 5 जुलै दरम्यान विक्रीसाठी उपलब्ध केले जाईल.
OnePlus Nord 2T ग्लोबल व्हेरिएंटप्रमाणेच स्पेसिफिकेशन्ससह आणला जाईल. डिव्हाइसमध्ये 6.43-इंच FHD + 90Hz डिस्प्ले मिळेल, ज्याच्या डाव्या बाजूला पंच-होल आहे. फोनला 50MP प्रायमरी कॅमेरा, 8MP 120˚ अल्ट्रावाइड सेन्सर आणि 2MP डेप्थ सेन्सर मिळेल. फोन MediaTek Dimensity 1300 चिपसेटद्वारे समर्थित आहे आणि 12GB LPDDR4X RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेजसह पेयर केला गेला आहे.
फोनमध्ये 4500mAh बॅटरी मिळेल, जी 80W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करेल. डिव्हाइस ऑक्सिजन OS 12.1 वर आधारित Android 12 वर काम करेल. यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी, 5G, 4G LTE, ड्युअल-बँड WiFi 6, ब्लूटूथ 5.2, GPS आणि अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट रीडर, USB-C पोर्ट आणि स्टिरीओ स्पीकर देण्यात आले आहेत.