OnePlus Nord 2T वर पहिल्या सेलमध्ये मिळतेय प्रचंड सवलत मिळत आहे, जाणून घ्या ऑफर

Updated on 19-Apr-2023
HIGHLIGHTS

OnePlus Nord 2T 5G ची आज पहिली सेल

पहिल्या सेलमध्ये स्मार्टफोन प्रचंड सवलतीसह खरेदी करा

स्मार्टफोन OnePlus India चॅनेल आणि ई-कॉमर्स साइट Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध

OnePlus Nord 2T 5G आज म्हणजेच 5 जुलै रोजी भारतात प्रथमच विक्रीसाठी उपलब्ध जाईल. फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये आणि कलर ऑप्शन्समध्ये येतो. ग्राहक OnePlus India चॅनेल आणि ई-कॉमर्स साइट Amazon वरून डिव्हाइस खरेदी करू शकतात. हा स्मार्टफोन मागील वर्षी आलेल्या OnePlus Nord 2 चा सक्सेसर आहे आणि त्यात MediaTek कडून लेटेस्ट Dimensity 1300 चिपसेट आहे. चला तर जाणून घेऊयात पहिल्या सेलमध्ये तुम्ही Nord 2T 5G किती किमतीत खरेदी करू शकता आणि त्याचे फीचर्स…

हे सुद्धा वाचा : 100 रुपयांपेक्षा कमी किमतीत 3 जबरदस्त रिचार्ज प्लॅन, दररोज 2GB डेटा उपलब्ध, कॉलिंग देखील फ्री

OnePlus Nord 2T 5G ची भारतातील किंमत आणि विक्री ऑफर

OnePlus Nord 2T 5G दोन व्हेरिएंटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. 8GB RAM आणि 128GB स्टोरेज आणि 12GB RAM आणि 256GB स्टोरेज या दोन व्हेरिएंटमध्ये स्मार्टफोन उपलब्ध आहे. त्यांची किंमत अनुक्रमे 28,999 रुपये आणि 33,999 रुपये आहे.

कंपनी ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 1,500 रुपयांची झटपट सूट देखील देत आहे. ICICI बँकेकडून EMI वर फोन खरेदी करतानाही हीच ऑफर उपलब्ध आहे. म्हणजेच ग्राहक हा फोन 27,499 आणि 32,499 रुपयांना खरेदी करू शकतात. यासोबतच जर तुम्हाला हा फोन तुमच्या कोणत्याही जुन्या फोनसोबत एक्सचेंज करून घ्यायचा असेल, तर तुम्हाला 8,900 रुपयांची सूट मिळेल. त्यानंतर फोनची किंमत तुमच्यासाठी 20,099 रुपये असेल.

OnePlus Nord 2T 5G चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus Nord 2T मध्ये फुल HD+ रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह 6.43-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेमध्ये HDR10+ सपोर्ट देखील आहे. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरे दोन मोठ्या गोल कटआउट्ससह आहेत. मागील कॅमेरा सिस्टममध्ये 50-मेगापिक्सेलचा सोनी IMX766 प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा तिसरा सेन्सर समाविष्ट आहे. प्रायमरी कॅमेर्‍यामध्ये तीक्ष्ण प्रतिमा आणि व्हिडिओंसाठी OIS (ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन) आहे.

फ्रंट पॅनलमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32-मेगापिक्सेल सेन्सर आहे. फोन OxygenOS 12.1 आधारित Android 12 वर चालतो आणि 89W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह 4,500mAh बॅटरीसह येतो.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :