OnePlus Nord 2T 5G भारतीय बाजारपेठेत जुलैमध्ये लॉन्च करण्यात आला होता. मात्र, आतापर्यंत या फोनच्या किमतीत कपात करण्यात आलेली नाही. परंतु जर तुम्ही हे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही आतापर्यंतची सर्वोत्तम संधी आहे. हा फोन फ्लिपकार्टवर मोठ्या डिस्काउंटसह खरेदी केला जाऊ शकतो. या दरम्यान, बँक ऑफरनंतर, फोनची किंमत 3,000 रुपयांपर्यंत कमी केली जाऊ शकते. बघुयात डिल…
हे सुद्धा वाचा : UPI मधून चुकीच्या ठिकाणी पैसे ट्रान्सफर झाले? काळजी करू नका, फक्त 'ही' सोपी प्रक्रिया करा
ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर OnePlus Nord 2T 5G च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 28,999 रुपये आहे. बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 10 % म्हणजेच रु. 2,000 ची झटपट बँक सूट मिळू शकते. तर, फेडरल बँक क्रेडिट कार्डवरून 10 टक्के म्हणजेच 3,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. याशिवाय Flipkart Axis Bank कार्डवरून 5 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. हा फोन 1,796 रुपयांच्या EMI सह खरेदी करता येईल.
OnePlus Nord 2T 5G मध्ये 6.43-इंच लांबीचा फुल HD + AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सेल, 20: 9 आस्पेक्ट रेशो आणि 90Hz रिफ्रेश रेट आहे. प्रोसेसर म्हणून, OnePlus Nord 2T 5G मध्ये Octa Core MediaTek Dimensity 1300 SoC देण्यात आला आहे. यात 8GB रॅम आणि 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे. तसेच, यात 4,500mAh ची ड्युअल सेल बॅटरी आहे, जी 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
त्याबरोबरच कॅमेरा म्हणून, यामध्ये f/1.8 अपर्चरसह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा आणि f/2.2 अपर्चरसह 2-मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा आहे. तसेच, या स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये f/2.4 अपर्चर असलेला 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. ऑपरेटिंग सिस्टम म्हणून, ते Android 12 वर आधारित OxygenOS 12.1 वर कार्य करते.