OnePlus चा नवीन फोन OnePlus Nord 2T 5G भारतात लाँच होण्यासाठी सज्ज आहे. OnePlus Nord 2T 5G या महिन्याच्या अखेरीस भारतात लाँच होईल. लाँचच्या अगोदर, OnePlus Nord 2T 5Gचे फीचर्स आणि संभाव्य किंमत लीक झाली आहे. एका टिपस्टरने फोनच्या फीचर्सबाबत माहिती दिली आहे. OnePlus Nord 2T 5G स्मार्टफोन भारतापूर्वी इतर अनेक मार्केटमध्ये आधीच लाँच झाला आहे.
टिपस्टर पारस गुगलानी यांच्या मते, OnePlus Nord 2T 5G ची भारतात किंमत 30,000 रुपयांपेक्षा कमी असेल. हा स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वर विक्रीसाठी उपलब्ध असेल. OnePlus Nord 2T 5G जागतिक बाजारपेठेत 399 युरो म्हणजेच सुमारे 33,400 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा : iPhone SE च्या किमतीत मिळतोय iPhone 12, Amazon सेलमध्ये बंपर ऑफरमध्ये भारी सूट
OnePlus Nord 2T 5G मध्ये Android 12 आधारित OxygenOS 12.1 आहे. याशिवाय, यात 6.43 इंच फुल HD + डिस्प्ले आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश दर 90Hz आहे आणि त्यासोबत HDR10+ चा सपोर्ट आहे. डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास 5 आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 1300 प्रोसेसरसह 12 GB पर्यंत RAM आणि 256 GB स्टोरेज आहे. OnePlus Nord 2T 5G मध्ये तीन रियर कॅमेरे आहेत, ज्यात प्रायमरी लेन्स 50-मेगापिक्सेलचा Sony IMX766 सेन्सर आहे, ज्यासोबत ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन आहे.
दुसरी लेन्स 8-मेगापिक्सेल सोनी IMX355 अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. तिसरी लेन्स 2-मेगापिक्सेल मोनोक्रोम लेन्स आहे. सेल्फीसाठी 32-मेगापिक्सलचा Sony IMX615 सेन्सर आहे. फोनमध्ये 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 4500mAh बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, Wi-Fi 6, ब्लूटूथ v5.2 आणि NFC सह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.