वनप्लस आपल्या सर्व स्मार्टफोन्सवर देत आहे एक्सचेंज ऑफर्स

Updated on 01-Dec-2015
HIGHLIGHTS

वनप्लसने ह्या ऑफर्ससाठी ऑनलाइन शॉपिंग साइट रिग्लोबशी भागीदारी केली आहे, त्याचबरोबर कंपनी वनप्लस 2 सह B2X सर्विस आणि वनप्लस X सह B2X ऑनगार्ड सर्विस फ्री देत आहे.

मोबाईल निर्माता कंपनी वनप्लसने आपले सर्व स्मार्टफोन्सवर एक्सचेंज ऑफर्सची घोषणा केली आहे. वनप्लसने सोमवारी आपले स्मार्टफोन्स वनप्लस 1, वनप्लस 2 आणि वनप्लस X साठी आकर्षक एक्सचेंज ऑफर्सची घोषणा केली आहे. वनप्लसच्या ह्या एक्सचेंज सर्विसविषयी कंपनीने आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

 

वनप्लसने ह्या ऑफर्ससाठी ऑनलाईन शॉपिंग साइच रिग्लोबशी भागीदारी केली आहे. त्याचबरोबर कंपनी वनप्लस 2 सह B2X सर्विस आणि वनप्लस X सह B2X ऑनगार्ड सर्विस मोफत देत आहे. ही ऑफर तेव्हाच मिळेल जेव्हा आपल्या एक्सचेंज फोनची किंमत पाच हजार रुपयांपेक्षा जास्त असेल.

जर आपण ह्या ऑफरचा लाभ घेऊ इच्छिता, तर आपल्याला सर्वात आधी कंपनी पेजवर जाऊन नोंदणी करावी लागेल आणि आपल्या फोनची माहिती द्यावी लागेल. नोंदणीची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर आपल्याला रिग्लोब टीमकडून कॉल येईल जेथे आपल्याला एक्सचेंज ऑफरविषयी सर्व माहिती दिली जाईल. त्यानंतर आपण आपला फोन एक्सचेंज ऑफरमध्ये देऊ शकता.

ह्या ऑफरमध्ये ग्राहक नवीन फोनच्या खरेदीमध्ये कॅशबॅक घेऊ शकता किंवा अॅमेजॉन स्टोरवरुन खरेदीसाठी गिफ्ट वाउचर प्राप्त करु शकतात. एक्सचेंज ऑफरचा लाभ फोनच्या खरेदी आधी आणि खरेदी नंतरसुद्धा घेऊ शकता.

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :