मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी वनप्लसने भारतीय बाजारात आपली नवीन पॉवर बँक सादर केली आहे. वनप्लसच्या ह्या पॉवर बँकची क्षमता 10000mAh आहे. भारतीय बाजारात कंपनीने आपल्या ह्या पॉवर बँकची किंमत १३९९ रुपये ठेवली आहे.
ह्या पॉवर बँकला ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून खरेदी करु शकता. हा अॅमेझॉनवर उपलब्ध झाला आहे. वनप्लस पॉवर बँकवर ग्राहकाला एका वर्षाची मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी मिळेल.
वनप्लसच्या ह्या पॉवर बँकचे वैशिष्ट्य म्हणजे , ह्या डिवाइसमध्ये ड्यूल युएसबी पोर्ट दिला गेला आहे. ज्याच्या माध्यमातून ग्राहक एकाचवेळी दोन डिवाइस चार्ज करु शकतात. ह्याची क्षमता 10000mAh आहे. ह्यात जी बॅटरी आहे, ती लिथियम पॉलिमर बॅटरी आहे. ही पॉवर बँक काळ्या रंगात उपलब्ध आहे आणि हा वजनानेही हलका आहे.
त्याच डिवाइसमध्ये LED इंडिकेटर आहे, ज्याच्या साहाय्याने डिवाइस किती चार्ज झाला आहे, ह्याची माहिती मिळेल. कंपनीनुसार ही पॉवर बँक ६ तास पुर्ण चार्ज होण्यासाठी सक्षम आहे. ही पॉवर बँक साधारण अॅनड्रॉईड फोनला तीनदा पुर्णपणे चार्ज करु शकते.