वनप्लस पुढील महिन्यात भारतात आपले आणखी पाच असे सर्विस सेंटर्स सुरु करणार आहे.
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी वनप्लस लवकरच बाजारात आपला नवीन फोन वनप्लस 3 लाँच करणार आहे आणि ह्या लाँचच्या आधीच कंपनीने भारतात आपले पहिले एक्सक्लुसिव सर्विस सेंटर सुरु केले आहे. कंपनीचे हे पहिले एक्सक्लुसिव सर्विस सेंटर बंगळूरुमध्ये सुरु झाले आहे आणि लवकरच कंपनी दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद आणि चेन्नईमध्येसुद्धा आपले सर्विस सेंटर सुरु करणार आहे.
ह्या एक्सक्लूसिव सर्विस सेंटरविषयी कंपनीने दावा केला आहे की, हा एक तासाच्या आत कोणत्याही यूजरला फोन ठीक करुन परत दिला जाईल. त्याचबरोबर कंपनी पिकअप-ड्रॉप सुविधा देत आहे. त्याचबरोबर एक्सक्लुसिव सर्विस सेंटरवर लोक कोणत्याही वनप्लस स्मार्टफोनला खरेदी करण्याआधी पाहू शकता, त्याचबरोबर तेथे तुम्ही तो वापरुनसुद्धा पाहू शकता.
वनप्लसचे हे पाऊल कंपनीसाठी खूपच फायद्याचे असल्याचे बोलले जात आहे. ह्याआधी यूजर्स ह्या गोष्टीला घेऊन बरेच दुहेरी मन:स्थितीत होते, की जर त्यांनी वनप्लसचा फोन घेतला पण जर त्यात काही समस्या आली तर तो कोणाकडून ठिक करुन घ्यायचा. मात्र आता कंपनीने ह्या स्मार्टफोनचे सर्विस सेंटर चालू केल्यामुळे आता यूजर्सला कोणतीही अडचण येणार नाही.