वनप्लस ने आपल्या OnePlus 5 आणि 5T स्मार्टफोंस साठी फिक्स ची घोषणा केली आहे ज्यामुळे या स्मार्टफोंस मध्ये नेटफ्लिक्स, अमेजॉन प्राइम वीडियो आणि गूगल प्ले मूवीज इत्यादी वरून HD कंटेंट स्ट्रीम केले जाऊ शकते. हा पॅच आता OTA अपडेट ने पाठवला नव्हता आणि त्यामुळे यूजर्सना आपले डिवाइस कंपनी मध्ये कुरियर करावे लागतील, जिथे हा इशू ठीक करून 5 वर्किंग दिवसांनी फोन परत पाठवला जाईल. अजूनतरी याची काहीच माहिती नाही मिळाली की हा अपडेट डाटा फॉर्मेट किंवा रिसेट करेल की नाही.
वनप्लस चे म्हणने आहे की डिवाइस कुरियर करण्याचे पैसे कंपनी देईल. पण कंपनी फक्त उत्तर अमेरिका, यूरोप, भारत आणि चीन च्या सर्विस क्षेत्रामधील राहणार्या आपल्या ग्राहकांना ही सेवा देत आहे. जे ग्राहक ईतर ठिकाणी राहतात त्यांना डिवाइसे कुरियर करण्याचा खर्च स्वतःहून करावा लागेल. कंपनी नुसार डिवाइस अपडेट दरम्यान सिक्योरिटी प्रोसेस मुळे या स्मार्टफोंस साठी हा इशू OTA अपडेट ने फिक्स नाही करता येणार. अपडेट साठी डिवाइस ला प्रमाणित PC शी फिजिकली कनेक्ट करावे लागेल.
वनप्लस फोरम वर एक कम्युनिटी मॅनेजर David Y ने सांगितले, “ सिक्योरिटी प्रोसेस मुळे आम्ही डिवाइस प्रमाणित PC शी कनेक्ट करूनच हा अपडेट देऊ शकतो. आम्ही OnePlus 5 आणि OnePlus 5T स्मार्टफोंस ची कुरियर कॉस्ट कवर करत आहोत, यूजर्सना आपले डिवाइसेज अपडेट साठी पाठवावे लागतील. तुमचा डिवाइस 5 वर्किंग डेज मध्ये तुम्हाला मिळेल. आम्ही ही प्रोसेस आणण्यासाठी खुप मेहनत केली आहे आणि या मुळेच आम्ही उत्तरी अमेरिका, यूरोप, भारत आणि चीन सोडून अन्य भागातील कुरियर कॉस्ट देऊ शकणार नाही."
OnePlus 5 आणि 5T मधील ही समस्या मागच्या वर्षी डिसेंबर मध्ये समोर आली. या डिवाइसेजना लेवल 3 वाइडवाइन सर्टिफिकेशन मिळालेले आहे ज्यामुळे SD वीडियो स्ट्रीम केले जाऊ शकतात आणि HD मध्ये DRM प्रोटेक्टेड कंटेंट बघण्यासाठी लेवल 1 सर्टिफिकेशन ची आवश्यकता आहे. वाइडवाइन सर्टिफिकेशन प्रसिद्ध स्ट्रीमिंग सर्विसेस कडून वापरले जाते ज्यात नेटफ्लिक्स, अमेजॉन प्राइम वीडियो आणि गूगल प्ले मूवीज चा समावेश आहे.