फ्लॅगशिप किलर लोकप्रिय कंपनी OnePlus ने देखील दिवाळी सेलची घोषणा केली आहे.
OnePlus 11R आणि OnePlus 11R सोलर रेड एडिशनवर 2000 रुपयांची सूट उपलब्ध
OnePlus 10 Pro 5G आणि OnePlus 10T 5G वर 5,000 रुपयांची झटपट बँक सूट
सध्या सणासुदीच्या हंगामात फ्लिपकार्ट आणि AMAZON वर दिवाळी सेल सुरु आहे. या सेलदरम्यान स्मार्टफोन्सवर अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. मात्र, स्मार्टफोन उत्पादकही आपल्या प्रोडक्ट्सवर स्वतंत्रपणे सूट देत आहेत. आता फ्लॅगशिप किलर लोकप्रिय कंपनी OnePlus ने देखील दिवाळी सेलची घोषणा केली आहे. सेलदरम्यान तुम्हाला अनेक स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर्स मिळतील.
OnePlus Diwali Sale Special Offers
OnePlus ने दिवाळी सेलची घोषणा केली आहे. याचा फायदा घेऊन तुम्ही OnePlus 11R आणि OnePlus 11R सोलर रेड एडिशन खरेदी करू शकता. या दोन्ही स्मार्टफोन्सवर 2000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. याशिवाय ग्राहकांना 9 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI चा पर्याय देखील मिळत आहे.
या डिवाइसची किंमत 45,999 रुपये आहे. कंपनीने हा डिवाइस काही दिवसांपूर्वीच भारतात लाँच केला आहे. यात स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 प्रोसेसर आहे. फोनमध्ये 18GB रॅम आणि 512GB स्टोरेज आहे. डिव्हाइस 50MP प्राथमिक कॅमेरासह येतो. यामध्ये तुम्हाला 5000mAh बॅटरी आणि 100W फास्ट चार्जिंग मिळते. हे उपकरण केवळ 25 मिनिटांत 0 ते 100% चार्ज होते.
लोकप्रिय स्मार्टफोन्सवरील ऑफर्स
OnePlus 10R बद्दल बोलायचे झाले तर, यावर 3000 रुपयांची झटपट बँक सूट मिळत आहे. याशिवाय कंपनी 7000 रुपयांची विशेष कूपन सूट देखील देत आहे.
तुम्हाला OnePlus 10 Pro 5G आणि OnePlus 10T 5G वर 5,000 रुपयांची झटपट बँक सूट देखील मिळण्याची शक्यता आहे. या दोन्ही फोनवर अनुक्रमे 14 हजार आणि 10 हजार रुपयांची सूट मिळत आहे. लक्षात ठेवा की, बँक ऑफरचा लाभ फक्त ICICI बँक कार्ड आणि वन कार्डवर उपलब्ध असेल.
OnePlus 11R 5G Solar Red ची किंमत 45,999 रुपये आहे. तर OnePlus 10R ची किंमत 27,999 रुपये आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.